min raut1 750x375 1
Technology

साहित्य वर्तुळातील नामवंतांचा पुरस्कार नागपूरसाठी भूषणावह – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नागपूर-  साहित्य, कला,सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय चळवळीचे केंद्र असणाऱ्या नागपूर शहरातील तीन नामवंतांना साहित्य व सामाजिक क्षेत्रातील मिळालेले पुरस्कार विदर्भासाठी भूषणावह आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे केले. अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाऊंडेशनचे तीन मानाचे पुरस्कार यावर्षी प्रसिद्ध नाटककार, साहित्यिक महेश एलकुंचवार, ज्येष्ठ पत्रकार, लेखक श्याम पेठकर, सामाजिक कार्यकर्ता, प्रकाशक अरुणा सबाने या नागपुरातील तीन नामवंतांना मिळाले आहेत. या तीनही ज्येष्ठांपर्यंत पोहोचून आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.

                या सत्काराच्या वेळी भावना व्यक्त करताना ते म्हणाले, समाजकार्य, सांस्कृतिक महोत्सव, साहित्यनिर्मिती, कला, क्रीडा क्षेत्रात नागपूरचे नाव पर्यायाने विदर्भाचे नाव कायम अग्रेसर असणे एक नागपूरकर या नात्याने अभिमानास्पद आहे. महाराष्ट्र फाऊंडेशनने कोणताही अर्ज न घेता हे पुरस्कार प्रदान केले हे उल्लेखनीय आहे. कला व सामाजिक क्षेत्रातील नामवंत आपापल्या क्षेत्रात फकिरी वृत्तीने वावरत असतात, त्यांची त्यांच्या नकळत स्वतः दखल घेऊन सन्मान करणे प्रेरणादायी आहे. त्यामुळेच प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना सन्मानित करण्याचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या निवासस्थानी भेट देऊन पालकमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला. तर ज्येष्ठ पत्रकार, नाटक -चित्रपट पटकथाकार श्याम पेठकर, सामाजिक कार्यकर्ता अरुणा सबाणे यांचा भरतनगर वनराई कार्यालयात सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र फाऊंडेशन तर्फे महेश एलकुंचवार यांना यावर्षीचा दिलीप वि. चित्रे स्मृति साहित्य जीवनगौरव सन्मान मिळाला आहे. तर विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकल महिलांवर आधारित तेरवं या नाट्यसंहितेसाठी रा. श. दातार नाटय पुरस्कार श्याम पेठकर यांना मिळाला आहे. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अरूणा सबाने यांना कार्यकर्ता (प्रबोधन ) पुरस्कार मिळाला आहे.

                 कृतज्ञता सत्कार सोहळ्याला पालकमंत्र्यांसोबत, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देशमुख, निलेश खांडेकर, प्राध्यापक जवाहर चरडे, वंदना वनकर आदी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

126904272 1765867386911009 7423974680860265992 nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
📷 विवाह दिनांक – 27 डिसेंबर 2020
📷 स्थळ – हरिभाई देवकरण,प्रशाला प्रांगण , सोलापूर
सोलापूर येथे आयोजित केला आहे. तरी ईच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी संपर्क करावा.
संपर्क – लोकमंगल फौंडेशन 13 अ , सह्याद्री नगर , विकास नगर ,जुना होटगी नाका , सोलापूर
नाव नोंदणी अंतिम तारीख –
20 डिसेंबर 2020
फोन नं – (0217) 232240
मो – 9657709710
Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com