शेतकरी

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीपूरक उद्योगात पशु व दुग्ध व्यवसायाला चालना महत्त्वाची

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नांदेड- जिल्ह्याच्या विविध विकास कामामध्ये ग्रामीण भागात शेतीला पुरक उद्योगाची जोड देण्यात व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये दुग्धव्यवसाय हा अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकेल. या व्यवसायाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी आता प्रत्येक तालुक्याला पुरेशा साधन सामुग्रीसह एक पशु चिकित्सा वाहन उपलब्ध करुन देण्याबाबत निश्चित प्रयत्न केले जातील असे, प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

                          जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील पशुपालकांना त्यांच्या आजारी पडलेल्या पशुधनाला त्यांच्या गावातच उपचार मिळावेत या उद्देशाने राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला मिळालेल्या तीन पशु चिकित्सा व उपचार वाहनाचे लोकार्पण आज जिल्हा परिषदेच्या प्रागंणात त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कोविड अंतर्गंत असलेल्या नियमाचे पालन करुन आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या महापौर मोहीनी येवनकर, आमदार अमरनाथ राजुरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती पदमा सतपलवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती बालासाहेब रावणगावकर, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाजकल्याण सभापती रामराव नाईक, महिला व बालकल्याण सभापती सुशिलाबाई पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शदर कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, गोविंदराव नागेलीकर, सुरेशराव अंबुलगेकर याच्यांसह जिल्ह्यातील पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

                इतर जिल्ह्याच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यातील तालुक्याची संख्या व क्षेत्रफळ अधिक आहे. कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात आपण जिल्ह्याच्या विकासासाठी 355 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी दिली आहे. यात आदिवासी विकास विभागामार्फत वेगळी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यातून साकारणाऱ्या विविध शासकीय योजना जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचल्यास खऱ्या गरजूपर्यंत पोहचता येईल असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करुन माहिती, शिक्षण व प्रसार यावर जिल्हा परिषदेने भर द्यावा असे सूचित केले. नांदेड जिल्हा परिषद ही वैविध्यपूर्ण योजना अंमलबजावणीत नेहमीच अग्रेसर राहिली आहे. जिल्ह्याने केलेल्या या विविध कामगिरीचे पालकमंत्री महोदयांनी कौतुक केले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com