Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मुंबई- स्थानिक लोकाधिकार समितीने विविध उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे काम हाती घ्यावे, त्यासाठी समर्पित आणि अद्ययावत अशी कौशल्यविकास प्रशिक्षण संस्था स्थापन करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, न्यु इंडिया इन्शुरंस कंपनीच्या वाढीत स्थानिक लोकाधिकार समितीचे योगदान खूप मोठे आहे. महाराष्ट्रीय माणसाला विशेषत: मराठी माणसाला त्याचा हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिक लोकाधिकार समितीने जो संघर्ष केला त्यातून आज कंपनीमध्ये मराठी माणसाचा टक्का वाढलेला दिसून येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज आपल्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी अनलॉक प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक उद्योग क्षेत्रात झाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
अतुल सहाय यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. त्यांनी विविध क्षेत्रातील गुंतवणूकदार महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे सांगताना शासन यासाठी करीत असलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खासदार अनिल देसाई यांनी केले.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143