Crime Solapur City

गावठी शिंदी व्यावसायिक आनंद भंडारी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर-  शहरातील जेलरोड व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गावठी शिंदी व्यावसायीक गुन्हेगार आनंद कनकय्या भंडारी (वय ५८ वर्षे, रा. घर क्र.१०/४४ घोंगडे वस्ती, जय भवानी बगीचा समोर, सोलापूर) यास एमपीडीए अधिनियम, १९८१ अन्वये शुक्रवारी, दि .१९ मार्च रोजी स्थानबध्द करण्यात आले. त्यास आदेशाची बजावणी करुन येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानागी करण्यात आली. आनंद भंडारी हा त्याच्या साथीदारासह आर्थिक फायद्यासाठी जेलरोड व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत गेल्या अनेक वर्षापासून अवैध गावठी शिंदीच्या व्यवसायात गुंतलेला आहे. तो बेकायदेशिर गावठी शिंदीची वाहतूक आणि विक्री करीत असल्याचे २१ गुन्हे त्याच्याविरूध्द दाखल आहेत. त्याला त्या व्यवसायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०१८, २०१९ व २०२० मध्ये कलम ९३ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई सुध्दा केली. त्याने पुन्हा अवैध गावठी शिंदीचा व्यवसाय चालूच ठेवला. गतवर्षात त्याने महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातील तरतुदीचा भंग केल्याने त्याच्याविरुद्ध ४ गुन्हे झाले. आनंद भंडारी हा गावठी शिंदीचे अड्डे चालवितो. त्याच्या बेकायदा व्यवसायास विरोध करणारे किंवा पोलीसांना माहिती देणाऱ्या लोकांना तो त्याच्या साथीदारासह उघडपणे शस्त्रासह मारहाण करतो. अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करुन आनंद भंडारी याने परिसरात दहशत निर्माण करुन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली. त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्यास एमपीडीए अधिनियम, १९८१ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित केले. सोलापुरात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसाय करणारे, सराईत गुंड, समाज विघातक कृत्य करणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून, त्याप्रमाणे यापुढेही अशीच कारवाई चालू राहणार असल्याचे पोलीस आयुक्तालय कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143