Lockdown

अखेर उद्या सायंकाळपासून गोव्यात लॉकडाऊनसुरू होणार

पणजी- आता महाराष्ट्रापाठोपाठ आता शेजारी राज्य असणाऱ्या गोव्यातही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत घोषणा केली आहे. गुरुवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे. गोव्यात 3 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅसिनोज, हॉटेल्स,पब्स इ. सर्वकाही या कालावधीत बंद राहणार आहेत. गोव्याच्या सीमा देखील केव अत्यावश्यक गोष्टींसाठीच खुल्या राहणार आहेत. बुधवारी प्रमोद सावंत यांनी याबाबत घोषणा केली आहे.

दरम्यान गोव्यामध्ये परिस्थिती भीषण आहे. गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी लॉकडाऊन अत्यंत आवश्यक असल्याचा इशारा आधीच दिला होता. तरी देखील गोव्यात लॉकडाऊन लागू करण्यास इतका उशीर का झाला असा सवाल विचारला जात आहे. विश्वजीत राणे यांनी 26 एप्रिल रोजी ट्वीट करत लॉकडाऊनची आवश्यकता व्यक्त केली होती. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर त्यांना अशी माहिती मिळाली होती की येणाऱ्या दहा दिवसात दररोज 200 ते 300 जणांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्र्यांनी अशी भीती व्यक्त केल्यानंतर आज जवळपास 48 तासानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

पॉझिटिव्हिटी रेट गोव्यात सर्वाधिक

संपूर्ण देशभरात गोव्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक म्हणजेच 38.03 टक्के आहे. गोव्यापाठोपाठ पश्चिम बंगाल-29.67%, पद्दुचेरी- 29.59%, छत्तीसगड- 27.5%, हरयाणा- 25.28% आणि महाराष्ट्र- 23.47% या राज्यांचा क्रमांक आहे. गोव्यात आधी 30 एप्रिलपर्यंत नाईट कर्फ्यू आणि कलम 144 लागू करण्यात आला होता. ज्यानुसार पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई होती. शिवाय राज्यात विवाहसोहळा आणि अंत्यसंस्कारामधील लोकांची संख्या अनुक्रमे 50 आणि 20 पर्यंत मर्यादित आहे. दरम्यान आता गोव्यामध्ये पूर्णपणे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com