Economy Maharashtra Solapur City

‘लोकमंगल’ला राज्यात दुसरे स्थान प्राप्त करून देवू : आ.देशमुख

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- लोकमंगल सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेला लवकरच 20 वर्षे पूर्ण होत आहेत. हा क्षण येईपर्यंत या पतसंस्थेला राज्यात दुसरे स्थान मिळवून देवू, असा विश्‍वास लोकमंगल समूहाचे अध्यक्ष आ. सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.


  या पतसंस्थेच्या विजापूर रोडवरील आरटीओच्या 46 व्या शाखेचा शुभारंभ आ.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणूनमाजी कुलगुरू डॉ.इरेश स्वामी हे याप्रसंगी उपस्थित होते. राज्यात लोकमंगल पतसंस्था सद्या चौथ्या क्रमांकावर आहे, असे सांगून आ. देशमुख पुढे म्हणाले की , आज अठरा वर्षे झाली, ही संस्था स्थापन करून. पतसंस्थेचा कारभार व्यवस्थित सुरू आहे. अजून सोलापूरसह जिल्ह्याच्या बाहेर  50 शाखा सुरू करण्याचा मानस आहे. तेव्हा ठेवीदार व लोकांचा विश्‍वास प्राप्त करून राज्यात दुसरे स्थान मिळवू. संस्था उभी करताना आम्ही नाममात्र असतो. रोपटे लावणे हे आमचे कर्तव्य आहे पण हातात हात घालून अशा संस्था वाढवण्याचे काम नागरिकांचे देखील आहे. करोना आपत्तीत तीनशे पेक्षा अधिक लहान उद्योगांना कर्ज पुरवठा पतंस्थेने  केला, अशी माहितीही त्यांनी दिली.
  प्रारंभी आ. देशमुख व डॉ.स्वामी यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर पतसंस्थेचे चेअरमन गुरण्णा तेली, उपाध्यक्ष निर्मला भगवान कुंभार, उपमहापौर राजेश काळे, उद्योगपती अजितकुमार मेहता, प्रा.विलास मोरे, शाम पाटील, निवृत्त तहसीलदार शाहू कदम आदी, तज्ज्ञ संचालक हरिश्‍चंद्र गवळी, संचालक सरोजनी विजयकुमार टिपे, समाधान पाटील, युवराज अप्पाराव गायकवाड, शहाजी साठे, मुलाणी ङ्गैयाज अहमद सरदार, देवकुळे सिद्राम, भीमाशंकर कलशेट्टी, एसबीआयचे  उबाळे, वसंतराव विधाते, मनोहर येळणे, कुंभकर्ण शिंदे, लक्ष्मण पाटील, हडलगी दाऊद,तांबोळी सिकंदर, विनोद खंदारे, स्वाती कसबे उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार पुरूषोत्तम कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.मोरे यांनी आभार मानले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com