Solapur City

लोकमंगलची अन्नपूर्णा योजना राज्यात आदर्शवत : विक्रांत पाटील

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर (प्रतिनिधी) – गरजू आणि गरीब लोकांना अन्नदान करणे हे पुण्याचे काम आहे. लोकमंगल अन्नपुर्णा योजनेतून दररोज हजारो ज्येष्ठ आणि निराधार लोकांना घरपोच अन्नदान होत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. ही योजना राज्यात आदर्शवत अशी आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केले. पाटील हे शनिवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते त्यांनी यावेळी लोकमंगल अन्नपूर्ण योजनेला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकमंगल समूह संचालक तथा भाजपाचे युवा नेते मनीष देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. पाटील यांनी अन्नपूर्णा योजनेच्या कामाची पाहणी करून त्याच्या नियोजनाचे कौतूक केले. आ. सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली ही योजना आदर्शवत असून राज्यातील प्रत्येक युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ही योजना आपल्या शहरात कशी राबवता येईल याचा विचार करावा, असे आवाहन केले. याप्रसंगी युवा मोर्चाचे प्रदेशउपाध्यक्ष सुदर्शन पाथसकर, प्रदेश सचिव अनुप मोरे, प्रदेश सचिव गणेश कुटे, मंडळ अध्यक्ष महेश देवकर, संदीप जाधव, सागर अतनुरे, प्रथमेश कोरे, अक्षय अंजीखाने, धीरज छपेकर, जिलानी भाई सगरी, चिमण साठे, डॉ. शिवराज सरतापे, संदीप कुलकर्णी, दीपक चव्हाण, यतिराज होनमाने, समर्थ बंडे, विनोद कडगी, विशाल बनसोडे, विशाल शिंपी, विजय सुर्वे, रोहन मराठे, महेश जेऊरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143