loom-electricity-concession
Electricity

वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतवाढ

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीज दर सवलत घेणाऱ्या यंत्रमागधारकांना आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन (Online ) अर्ज करण्यास 7 ऑक्टोबर 2021 नंतर तीन महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती वस्त्रोद्योगचे प्रादेशिक उप आयुक्त चंद्रकांत टिकुळे यांनी दिली आहे.

            राज्यातील वस्त्रोद्योग घटकांना 21 डिसेंबर 2018 अन्वये वीज दर सवलत लागू केली आहे. वीज दर सवलतीला पात्र असणाऱ्या यंत्रमाग धारकांना आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर  ऑनलाईन (Online) अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत देण्यात आली होती. यंत्रमाग धरकांच्या संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांनी सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने 31 मे 2021 पर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. 2 सप्टेंबर 2021 पर्यंत पुन्हा अंतिम मुदतवाढ दिली होती. परंतु या मुदतीतही बहुतांश यंत्रमाग घटकांनी नोंदणी केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन, 27 अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभर असलेल्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी कोणत्याही प्रकाराने नोंदणी अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.

हे वाचा- कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात हा आदेश लागू

            संबंधित यंत्रमाग घटकांनी मुदतीच्या आत आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा ऑफलाईन  (27 अश्वशक्तीखालील घटक) नोंदणी करणे आवश्यक आहे. मुदतवाढीमध्ये संबंधित यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन नोंदणीसाठी अर्ज सादर न केल्यास वीज (Electricity) दर सवलत बंद करण्यात येईल, असेही  टिकुळे यांनी कळविले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com