LPG cylinders go up by Rs 265
Economy Maharashtra

दिवाळीपूर्वीच फुटला महागाईचा बॉम्ब ; ‘एलपीजी’ सिलेंडर 265 रुपयांनी महागला

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

पुणे – तेल कंपन्या पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज वाढ करत असल्याने आता गॅस सिलेंडरच्या दरातही (LPG Price 1 Nov) वाढ होणार अशी शक्यता गृहीत धरली जात होती. मात्र, केंद्र सरकारने गॅस सिलेंडरवरील अनुदान (Grant) कायम ठेवले आहे.

     १ नोव्हेंबर रोजी घरगुती गॅस सिलेंडरचे (Domestic Gas Cylinder) दर जाहीर करताना केंद्र सरकारने कोणतीही वाढ केली नाही. मात्र, त्याचवेळी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात (LPG Price 1 Nov) तब्बल २६५ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच महागाईचा ‘बॉम्ब’ फुटला आहे.

हे वाचा- अरे बापरे ! सूर्यामधून निघताना दिसले अधिक शक्तिशाली ज्वाळांचे वादळ

      ऑक्टोबर महिन्यात गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला नवे दर जाहीर करतात. पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. त्यामुळे आता गॅस सिलेंडरच्या दरातही (LPG Price 1 Nov) वाढ होणार अशी सर्वांची अटकळ होती. मात्र, नोव्हेंबरसाठी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ न करता ऑक्टोबरचे दर कायम ठेवले आहेत.

वितरकांचा काळा बाजार करण्याचा डाव फसला

गॅस सिलेंडरचे दर वाढणार हे गृहित धरुन गेल्या दोन तीन दिवसांपासून गॅस सिलेंडर वितरकांनी सिलेंडर वितरण जवळपास थांबविले होते. त्यात काल रविवार असल्याने वितरण पूर्ण बंद होते. शेकडो गॅस ग्राहकांना कंपन्यांकडून पावत्याही पाठविण्यात आल्या होत्या. एरवी एका दिवसात गॅस सिलेंडर मिळत असताना सणासुदीच्या दिवसात चार-चार दिवस सिलेंडर मिळत नव्हता. मात्र, घरगुती गॅस सिलेंडरचा दरात वाढ न केल्याने वितरकांचा (Distributors) काळा बाजार करण्याचा डाव फसला आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143