Fund Solapur City

यंत्रमाग कामगार व विडी कामगारांना शासनाकडून आर्थिक मदत दया

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

आमदार प्रणिती शिंदे यांची मा. मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष यांच्याकडे मागणी
सोलापूर- संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणूच्या प्रादूर्भावाने मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होत आहे. त्यामुळे आपल्या सरकारने राज्यामध्ये कडक निर्बंध लागू केले आहे. देशातील सर्वात जास्त रोजगार देणारा यंत्रमाग उद्योग असून देशात एकूण चालू असलेल्या यंत्रमाग उद्योग पैकी 50 टक्के पेक्षा जास्त यंत्रमाग हे महाराष्ट्र राज्यात असून भिवंडी, मालेगांव, इचलकरंजी, सोलापूर, विटा, सांगली या ठिकाणी यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची संख्या 25 ते 30 लाख असून त्यामधील जवळपास 1 लाखापर्यंत कामगार सोलापूर शहरात यंत्रमाग उदयोगामध्ये काम करीत आहेत. तसेच महाराष्ट्रात सुमारे 5 लाख विडी कामगार आहेत व सोलापूर शहरातील प्रमुख उद्योगापैकी विडी उत्पादनाचा उद्योग हा एक मोठा उद्योग असुन 17 प्रमुख विडी उत्पादन कारखान्यांच्या 145 ब्रँचेस आहेत. सदर उद्योगामध्ये सुमारे 70 हजार स्त्री, पुरुष कामगार, कर्मचारी काम करतात. त्यापैकी मुख्यत्वे सुमारे 60 हजार महिला ह्या विडी वळण्याचे काम करतात. सदर कामगारांचे उदरनिर्वाह रोजंदारीवर आहे. परंतू सद्यस्थितीमध्ये यंत्रमाग व विडी कारखाने बंद असल्यामुळे सदर कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे आपल्या शासनाने घरेलू कामगार, बांधकाम कामगार, रिक्षा चालक यांना दिलेल्या आर्थिक मदतीप्रमाणे यंत्रमाग व विडी उद्योगातील कामगारांच्या बँक खात्यावर महाराष्ट्र शासनाकडून 2000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, जेणेकरून त्यांचे लॉकडाऊनमध्ये जिवनमान सुरळीत सुरु राहील. याकरीता यंत्रमाग कामगार व विडी कामगारांकरीता शासनाकडून कामगारांना प्रत्येकी 2000 रुपये थेट त्यांच्या बॅकेच्या खात्यामध्ये जमा करून त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  नाना पटोले साहेब यांच्याकडे केली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com