Covid 19 Maharashtra निधन वार्ता

महाराष्ट्रात मृतांच्या संख्येने पुन्हा चिंता वाढवली

मुंबई- maharashtra राज्यात नव्याने बाधित झालेल्या रुग्णांच्या संख्येने पुन्हा एकदा 60 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. केवळ बाधितांचा आकडा मोठा नाही तर मृतांच्या death संख्येतही वाढ होत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. यामुळे वाढत्या रुग्ण संख्येला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. मात्र, ही रुग्ण संख्या काही कमी होताना दिसत नाही.

कोरोनामुळे काँग्रेसचे नेते राजीव सातव यांची प्रकृती चिंतादायक

            राज्यात 63,309 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 61,181 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.4 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.5 टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,65,27,862 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 44,73,394 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 42,03,547 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 31,159 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 985 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 352 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 251 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 342 मृत्यू हे एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.

प्रभाग तिथे लसीकरण केंद्र सुरू करा; भारतीय जनता युवा मोर्चेच्या वतीने विविध मागण्या

 

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com