Prize giving ceremony of Mahalakshmi Decoration Competition
Solapur City

बनशेट्टी अप्पा प्रतिष्ठान व कलासंगम फौंडेशनच्या वतीने महालक्ष्मी आरास स्पर्धेचे पारितोषिक समारंभ संपन्न.

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर – बनशेट्टी अप्पा प्रतिष्ठान व कलासंगम फौंडेशनच्या वतीने कोरोनाच्या काळात घेतलेल्या महालक्ष्मी स्पर्धेचे बक्षीस समारंभ आज शिवानुभव मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. ही स्पर्धा शहरी भाग व हद्दवाढ भाग असे दोन गटातून आयोजित करण्यात आली होती.

शहरी भागातील स्पर्धेचे
प्रथम पारितोषिक विजेते- अर्चना शिंदे
द्वितीय पारितोषिक विजेते – सुनीता चव्हाण, रवींद्र तळीखेडे
तृतीय पारितोषिक विजेते- प्रमोद शिंदे सविता गादेकर
उत्तेजनार्थ- सपना किरूरकर,प्रभावती कांबळे, सिद्रय्या बबलेश्वर, अक्षय भडगे, मंगल अजिखाने शुभम घोळसकर,

हद्दवाढ भाग-
प्रथम पारितोषिक विजेते-संध्या करळे
द्वितीय पारितोषिक विजेते – नारायण बनकर व अमरनाथ फुटाणे,
तृतीय पारितोषिक विजेते- करुणा कदम आणि सुरेखा म्हमाणे,
उत्तेजनार्थ- प्रिया घारे, राजश्री जाधव, ज्ञानेश्वर कचरे,निर्मला गवळी, राजश्री गोटे, आनंद मुस्तारे

विशेष पारितोषिक
राजेश केकडे
गणेश बिराजदार
संतोष हळगोदे

Prize giving ceremony of Mahalakshmi Decoration Competition

ह्यावेळी भाजपा शहर अध्यक्ष विक्रमजी देशमुख बोलताना म्हणाले की बनशेट्टी कुटूंबियाकडून कोराना काळात केलेलं काम वाखाणण्याजोगे आहे. सोलापुरातील उजनीच्या दुहेरी पाण्याच्या लाईनसाठी त्यांनी घेतलेले कष्ट अत्यंत कौतुकास्पद आहेत. प्रत्येक खेळाडू (Player) हा फक्त स्वतःसाठी न खेळता देशासाठी खेळला पाहिजे ही भावना त्यांनी ठेऊन फक्त स्वतःच्या वार्डापुरते न पाहता संपूर्ण सोलापूरचा विकास होण्याच्या दृष्टीने काम केलेले सोलापूरचे महापौर आहेत. त्यांनी त्याच बरोबरीने आपली संस्कृती व वारसा पुढील पिढीला कळण्यासाठी असे कार्यक्रम घेऊन याची महती वाढवत आहेत. असेही ते म्हणाले.

          याप्रसंगी बोलताना सौ.शोभाताई बनशेट्टी म्हणाल्या की आपण आपली संस्कृती जपली पाहिजे त्यासाठी येणारे आपले प्रत्येक सण उत्सव उत्साहात साजरे केले पाहिजे. आणि यासाठी आम्ही गेल्या वीस वर्षांपासून सतत प्रयत्न करत आहोत. महावीर बँकेचे चेअरमन दीपकजी मुनोत यांनी बोलताना संस्थेच्या कामाचे कौतुक करून या संस्थेमुळे दांडिया खेळ फक्त श्रीमंताचा नसून सर्व थरातील लोकांमध्ये लोकप्रिय झाला आहे. गेल्या 20 वर्षांपासून ही संस्था दांडिया, रांगोळी, महालक्ष्मी आरास स्पर्धा असे अनेक संस्कृतीने परिपूर्ण कार्यक्रम (Function) घेत जवळजवळ चार हजार युवक युवतीना परीक्षित केले आहे. यावेळी या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, महावीर बँकेचे चेअरमन दीपक मुनोत, माजी महापौर शोभाताई बनशेट्टी, आनंद मुस्तारे,अध्यक्ष पद्मा वेळापुरे, रूपा कुताटे आरती पिसे, नम्रता शाबादी, कुसुम चव्हाण श्रुती बंडे, ज्योती बटगेरी, निकता साराटे, आकाश शाबादी, अविनाश जिनकेरी बसवराज जमखंडी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन रवींद्र आमणे आणि प्रस्ताविक श्रीशैल बनशेट्टी तर आभार प्रदर्शन महेश पात्रीकर यांनी केली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143