Solapur City

सोलापूर सोशल फाउंडेशनच्या निबंध स्पर्धेत महिलाराज

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सोलापूर सोशल फाउंडेशनने तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या निबंध आणि छायाचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून निबंध स्पर्धेतील सहा विजेत्यांपैकी सहाही विजेत्या महिला आहेत. विशेष म्हणजे छायाचित्र स्पर्धेत मात्र एकाही महिलेला पुरस्कार मिळालेला नाही. सोलापूरची पर्यटन वैशिष्ट्ये असा या दोन्ही स्पर्धांचा विषय होता. या दोन्ही स्पर्धांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. निबंध स्पर्धेचा पहिला पाच हजार रुपयांचा पुरस्कार वैष्णवी अण्णासाहेब गरड आणि सुरेखा महादेव केवटे यांना विभागून देण्यात आला आहे. द्वितीय क्रमांकाचा तीन हजार रुपयांचा पुरस्कार आनंदी गजानन काळे यांनी पटकावला आहे. तर दोन हजार रुपयांचा तिसरा पुरस्कार श्‍वेता रावसाहेब पालकर यांनी मिळवला आहे. एक हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पुरस्कार पूजा दिलीप पाटील आणि दीपाली गुरुनाथ बोराळे यांना देण्यात आला आहे. याच निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेचा पाच हजार रुपयांचा पहिला पुरस्कार प्रवीण गायकवाड आणि राहुल गोडसे यांना मिळाला. अमोल मिस्कीन यांनी तीन हजार रुपयांचा दुसर्‍या क्रमांकाचा तर महेश बनसोडे याने दोन हजार रुपयांचा तिसरा पुरस्कार पटकावला. निशांत वाडकर आणि शुभम राजमाने यांना एक हजार रुपयांचे उत्तेजनार्थ देण्यात आले, अशी माहिती मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी दिली.

                पुस्कार वितरण समारंभ सोलापूर सोशल फाउंडेशनचे ब्रँड ऍम्बेसिडर राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी संचालक मयुरी वाघमारे-शिवगुंडे, रवींद्र मिनीयार, सल्लागार प्रा. नरेंद्र काटीकर, अमित जैन, संकेत जेसुदास हे उपस्थित होते. या दोन्ही स्पर्धांचे मुख्य समन्वयक म्हणून प्रा. नरेंद्र काटीकर यांनी काम पाहिले. या निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून बदिउज्ज्मा बिराजदार, प्रा. प्रशांत चाबुकस्वार आणि प्रा. गणेश देशपांडे यांनी काम पाहिले. छायाचित्र स्पर्धेचे परीक्षक म्हणून शिवानंद हिरेमठ यांनी काम पाहिले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com