Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
बुलडाणा – जम्मू काश्मिर मधील द्रास भागात लाईन ऑफ मेंटेनन्स करीत असताना हिम वादळामुळे हिमकडा अंगावर कोसळून जिल्ह्यातील पळसखेडा चक्का ता. सिं. राजा येथील जवान प्रदीप साहेबराव मांदळे 15 डिसेंबर रोजी शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव लेह, दिल्ली, मुंबई हवाई मार्गे औरंगाबाद येथे काल 19 डिसेंबर रोजी सायंकाळी आणण्यात आले. औरंगाबाद येथे विमानतळावर लष्कराकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर आज सकाळी औरंगाबाद येथून रस्ता मार्गे पळसखेड चक्का ता. सिं. राजा येथे त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी लष्कर, पोलीस यांनी बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवान प्रदीप मांडळे यांना मानवंदना दिली. मानवंदनेसाठी 100 आजी – माजी सैनिक उपस्थित होते. काही वेळासाठी पार्थिव शहीद जवान यांच्या घरी अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले. त्यानंतर अंत्ययात्रेला घरापासून सुरूवात करण्यात आली. संपूर्ण गावात रस्त्या–रस्त्यावर रांगोळी काढण्यात आल्या, तर मोठ्या प्रमाणावर श्रद्धांजलीचे बॅनर्स लावण्यात आले. यावेळी संपूर्ण गावात भावनिक वातारवण होते. शहीद जवान प्रदीप मांदळे अमर रहे.. च्या निनादात अंत्ययात्रा गावातून काढण्यात आली. अंत्यसंस्कारावेळी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#solapurcitynews
जाहिरात–
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143
लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

