Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- श्री श्री श्री 1008 श्रीशैल जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजीं यांचे युवा नेते मनिष सुभाष देशमुख यांनी अक्कलकोट रोड येथील होटगी मठात आशीर्वाद घेतले। याप्रसंगी मंद्रुपचे रेणुका शिवाचार्य महास्वामीजीं,गुड्डापुर देवस्थान ट्रस्टी सिद्धय्या स्वामी, प्रवीण वाले, महेश नांदगावकर, अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे, इरण्णा सावळगी उपस्थित होते.
याप्रसंगी श्रीशैल जगद्गुरू महास्वामीजीं यांनी सोलापूरात आयटी कंपनी व रोजगार आणण्यासाठी आपण प्रयत्न करावा असे सांगितले,यावेळी बोलताना मनिष देशमुख म्हणाले की,आजच आपण सोलापुरातील बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळावा घेतला आहे. या मेळाव्यात पुणे,सोलापूर येथील अनेक नामवंत कंपन्यांनी सहभाग नोंदवला असून,अनेक युवकांना रोजगार उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली व आपण सूचना द्याव्यात त्याचे पालन नक्की करू असे म्हणाले. यावेळी महास्वामीजीं यांनी मनिष देशमुख यांना शाबासकीची थाप देत,समाजप्रयोगी व लोकप्रयोगी कार्य असेच सुरू ठेवत बापूंचा वारसा चालवावा असे सांगितले व सुभाष बापूंचे देखील आम्हाला वेळोवेळी सहकार्य मिळते व दक्षिण तालुक्यात त्यांनी रस्त्याचे जाळे विणले असल्याचे कौतुक करताना म्हणाले
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143