Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- सोलापूर बाजार समितीच्या आवारात शेतकरी, व्यापारी-अडते, बाजार समितीचे कर्मचारी, माथाडी-तोलार कामगार रोज मोठया संख्येने शासनाने सांगितल्या प्रमाणे जिवनावश्यक सेवेसाठी, कामासाठी येतात. बाजारात इतर घटकही (मालवाहतूक करणारे, किरकोळ खरेदीसाठी येणारे ग्राहक) यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने, बाजार समितीच्या जीवनाआवश्यक सेवेत रुजू असणाऱ्या घटकांचा प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे गरजेचे आहे.
कोरोना संसर्गजन्य विषाणू रोखण्यासाठी युद्धपातळीवर लसीकरणाची मोहीम शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने सुरू आहे, आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेत बाजार समितीचा सहभाग लवकर व्हावा, बाजार समितीने कोविडं सेंटर बाबतीतही चांगला निर्णय घेतला आहे. तसेच लसीकरण केंद्र लवकर सुरू व्हावे. याकरिता तात्काळ उपाय योजना करावेत.बाजार समितीचे कर्मचारी, इतर सर्व परवानाधारकाचे प्राधान्याने प्रतिबंधक कोरोनाचे लसीकरण करून घेण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी अध्यक्ष सिद्धाराम रामशेट्टी, सचिव दिपक गदगे सोलापूर शहर तोलार कल्याणकारी संघटनेने केली आहे.
#solapurcitynews