fbpx
marriage-publication-of-booklet

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर Marriage- येथील ब्रह्म प्रतिष्ठान या संस्थेतर्फे प्रतिवर्षी वधू-वर परिचय पुस्तिका प्रकाशित केले जाते. त्याप्रमाणे याही वर्षी वधू-वर परिचय पुस्तिका प्रकाशित केली जाणार असून त्याचे प्रकाशन नवीन वर्षाच्या प्रथम दिवशी म्हणजे रविवार दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी सोलापुरात होणार आहे. यामध्ये सुमारे 400 ते 600 वधू-वरांची नावे समाविष्ट केली जाणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुहास देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंगळवेढा शहर परिसरातून फुस लावून अल्पवयीन मुलाला पळविले; अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल

            Marriage प्रतिवर्षीच ब्रह्म प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित होणाऱ्या पुस्तिकेचे समाजातून स्वागत होत असून प्रतिवर्षी नोंदणीस प्रतिसादही चांगला मिळत आहे. याही वर्षी असाच प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत  सुमारे 200 पेक्षाही अधिक वधू-वरांची नोंदणी झाली आहे.  यावर्षी इच्छुक वधू-वरांनी 25 डिसेंबर 2022 अखेर वधू-वरांची नोंदणी करता येणार आहे, अशी माहितीही सुहास देशपांडे यांनी दिली. ब्राह्मण समाजातील वधू-वर, पालक यांच्या वाढत्या अपेक्षा, वधूंच्या संख्येचे घटते प्रमाण, वयातील अंतर, उच्च शिक्षण, आपसातील संपर्क करण्यासाठी येणाऱ्या अडचणी या कारणांमुळे  सुयोग्य जोडीदार शोधणे ही एक समस्या  होत आहे.  या समस्येची तीव्रता कमी व्हावी तसेच जास्तीत जास्त वधु-वरांचे शुभमंगल ब्रह्म प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्हावे या दृष्टीने संस्था हा उपक्रम राबवीत आहे. संस्थेमार्फत वर्षातून एकदाच वधू-वर पालक परिचय पुस्तिका प्रकाशित केली जाते. गेल्या पंधरा वर्षातील संस्थेस मिळत असलेल्या वधु-वर पालकांचा वाढता प्रतिसाद पाहता अंदाजे 400 ते 600  वधू-वरांची नोंदणी होईल, असा अंदाजही देशपांडे यांनी व्यक्त केला. या पुस्तिकेच्या नोंदणीसाठी प्रतिष्ठानतर्फे पंढरपूर, सोलापूर शहर आणि पुणे या ठिकाणी सोय करण्यात आली आहे.  त्या त्या ठिकाणच्या इच्छुक वधू-वरांनी Marriage याचा लाभ घ्यावा.  

वधू-वर परिचय पुस्तिकेच्या अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संस्थापक अध्यक्ष सुहास देशपांडे (7709080721), अध्यक्षा सुजाता देशपांडे (8208214309), सचिव संजय गोखले (9421047343),  कोषाध्यक्ष वामन कुलकर्णी (7588163658),  ज्ञानेश्वर देगावकर (9823338582) यांच्या संपर्क साधावा, असे आवाहनही सुहास देशपांडे यांनी केले आहे. 

ब्रह्म प्रतिष्ठान संस्था ही ब्राह्मण समाजासाठी विविध सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. आमच्या संस्थेमार्फत, वर्तमान काळातील एक गरज म्हणून गेल्या 12 वर्षापासून देशी गायींची गोशाळाही चालविली जात आहे. या गोशाळेसाठी समाजातील विविध व्यक्तींचा आर्थिक तसेच वैयक्तिक सहयोगही मोठ्या प्रमाणावर लाभत आहे. या पवित्र कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर सहभागाची अपेक्षा व्यक्त करीत आहोत. या पत्रकार परिषदेस अध्यक्षा- सौ. सुजाता देशपांडे, कोषाध्यक्ष- वामन कुलकर्णी , सचिव संजय गोखले, कार्यकारिणी सदस्य- दत्तात्रय आराध्ये, श्याम जोशी, ज्ञानेश्वर देगावकर, पांडुरंग देशपांडे,  संजय पैठणकर, स्वाती कुलकर्णी आदी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

Corona Live Update