Maharashtra National

ठाण्यात प्रथमच आय.पी.एल.च्या धर्तीवर दोन दिवसीय क्रिकेट सामने

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

ठाणे- ठाण्यातील महागिरी येथे सार्वजनिक मैदान बचाव समितीच्या माध्यमातून रविवारी प्रथमच आय.पी.एल.च्या धर्तीवर दोन दिवसीय क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते.यामध्ये एस.व्हि.वाॅरियर्स या संघाने विजेतेपद पटकावले. खारकर आळी येथील ए के एम मैदानात निखिल बुडजुडे,नितेश (आऊ)पाटोळे, संदेश कवितके, योगेश क्षीरसागर यांच्या विशेष सहकार्याने क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होता. काही क्रिकेट प्रेमी तरुणानी एकत्र येत याच परिसरातील क्रिकेट खेळाडूसाठी सार्वजनिक मैदान बचाव समितीच्या अंतर्गत प्रथमच आय.पी.एल.च्या धर्तीवर दोन दिवसीय क्रिकेट सामने आयोजित केले होते.या स्पर्धेत विविध संघाने अप्रतिम खेळ करित स्पर्धेत रंगत आणली . या स्पर्धेत अंतिम सामना एस.व्हि.वाॅरियर्स व एस पी वाॅरियर्स यांच्यात झाला यामध्ये विजेतेपद या परिसरातील सचिन शिंदे व विशाल वाघ याच्या एस.व्हि.वाॅरियर्स या संघाने पटकावले. यामध्ये सर्वउत्कृष्ट गोलंदाज भाविन जैन,उत्कृष्ट फलंदाज ओंकार पाटील,मॅन ऑफ दि सिरीज हितेश नागरे यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाला सचिन चव्हाण,निलेश कोळी,सचिन शिंदे,हर्षल वाघ,अस्लम मुजावर,आदी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते. क्रिकेट हा खेळ फक्त मैदानात न राहता यामधील एकी एकमेकांना मदत,सहाय्य करण्यासाठी व प्रत्येकाच्या सुखदुःखात त्यांच्या मागे उभे राहण्यासाठी असावी तसेच विभागातील सर्व संघ एकत्र राहावेत या मूळ उद्देशाने या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून सर्व संघांचे संदेश कवितके यांनी आभार मानले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143