fbpx
FB IMG 1629035071478 1 सैन्य अधिकाऱ्यांच्या हस्ते केले शिवसृष्टी संकल्पनेचे उदघाटन
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा स्तुत्य उपक्रम

सोलापूर- श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, सोलापूर विभागातर्फे गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेतून तयार करण्यात आलेल्या ‘शिवसृष्टीचे’ उदघाटन रविवारी, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय सैन्य दलातील अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
सुभेदार मेजर गन बहादुर गुरुंग, बीएचएम बापू टेकनार, प्रविण ढोरे, विष्णू पवार शिवाजी ठोंबरे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी सैन्य अधिकाऱ्यांना ३२ मण सुवर्ण सिंहासनाचा संदेश देणारे सन्मानचिन्ह आणि गजानन मेंहदळे लिखित ‘शिवाजी महाराज नसते तर’ हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना आदर्श ठेवून श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानने अत्यंत चांगला उपक्रम राबविला आहे. या शिवसृष्टीसाठी लागेल ती मदत आम्ही करू असेही बीएचएम बापू टेकनार यांनी सांगितले. यावेळी ९ महाराष्ट्र बटालियनचे एनसीसीचे कॅडेट्स तसेच शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

हे वाचा- स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जय हिंद फूड बँकेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम संपन्न

 

काय आहे शिवसृष्टीची संकल्पना ?

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानतर्फे जुळे सोलापूरातील १० एकर जागेवर १०० झाडे लावण्यात आली आहेत. यातील झाडांना पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यासह स्वराज्यातील सरसेनापती आणि मावळ्यांची नावे देऊन त्या नावांचे फलक झाडांच्या संरक्षक जाळीवर लावण्यात आले आहेत. या सर्व १०० झाडांची जोपासनाही श्री शिवप्रतिष्ठानतर्फे करण्यात येणार आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Facebook Page- https://www.facebook.com/solapurcitynews/
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update