Solapur City News 47
Solapur City

बाजार समितीच्या नावात “सिद्धेश्वर” चा उल्लेख हवाच : सुदीप चाकोते

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर – शासन दरबारी श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती अशी नोंद असताना दैनंदिन व्यवहारात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या नावाचा सर्रास वापर होत आहे. दैनंदिन व्यवहारात आणि फलकावर सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचा उल्लेख, हवाच अशी मागणी करीत अखिल भारतीय वीरशैव महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदीप (दादा) चाकोते यांना बाजार समितीचे प्र.सचिव अंबादास बिराजदार यांना निवेदन दिले.  शिवयोगी सिद्धारामेश्वर महाराज हे सोलापूर चे ग्रामदैवत आहेत.सोलापूर हे बहुभाषिकांचे शहर आहे आजवर सोलापूर शहरावर कसलेच सकंट आले नाही ही सिध्दरामांचीच कृपा म्हणावी लागेल, हे सांगताना यापुढे बाजार समितीच्या दैनंदिन व्यवहारात आणि ई-नाम पोर्टलवर सिद्धेश्वर उल्लेख केला पाहिजे, अशी मागणी चाकोते यांनी केली आहे. बाजार समितीचे रजिस्टर, बुक, पावती, पुस्तके, व्यापाऱ्यांना देण्यात येणार परवाने आदींवरही सिद्धेश्वर या नावाचा समावेश करण्याची गरज असल्याचे सुदीप (दादा)चाकोते यांनी म्हटले आहे. निवेदन देण्याप्रसंगी प्रदीप मसुती, अतुल रजपूत, बबन चाकोते, कल्याणराव चौधरी, अनिल हलकट्टी, श्रीकांत दासरी, राम परीट, अप्पू शेख, सुनिल कांबळे, नागेश शहापूरे, शौकत मुजावर, अक्षय हलकट्टी, अभिषेक नाकाशे, अभिषेक माशाळा, कासिम शेख, आदी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143