fbpx
WhatsApp Image 2020 11 29 at 8.25.21 PM 750x375 1 केंद्रीय राखीव पोलीस दलातील असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव अनंतात विलीन
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नाशिक- भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांचे छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना निधन झाले. असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांच्यावर सायंकाळी नाशिक शहरातील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

              अंत्यसंस्कार स्थळी पार्थिव येताच राज्य शासनाच्या वतीने अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळनिमलष्करी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने महानिरीक्षक संजय लाटकरनाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस आयुक्त दीपक पांडेयनाशिक पोलीस परिक्षेत्राच्या वतीने परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकरजिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरेग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यानंतर केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांना अखेरची मानवंदना दिली. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी शहीद नितीन भालेराव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी ताडमेटला परिसरातल्या बुरकाल येथून ६ किलोमीटर अंतरावर स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २०६ कोब्रा बटालियनचे सहायक कमांडन्ट नितीन भालेराव यांना वीरमरण आले होते.

                          नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवपूर या गावचे मूळ असलेले शहीद नितीन भालेराव हे नाशिक शहरातील राजीवनगर येथे वास्तव्याला होते. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नाशिकच्या गोखले एज्युकेशन येथे पूर्ण करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून केंद्रीय राखीव दलात दाखल झाले होते. २०१० साली केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झालेले जवान नितीन भालेराव यांनी सर्वप्रथम जम्मू काश्मीर येथील कुलगाम येथे सेवा बजावली होती त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या विशेष संरक्षण टीम मध्ये त्यांनी सेवा दिली होती. त्यानंतर राजस्थानमधील माउंटअबू स्थित अंतर्गत सुरक्षा अकादमी‘ येथे त्यांनी काम केले होते. जून महिन्यापासून ते २०६ कोब्रा बटालियन मध्ये सहाय्यक कमांडन्ट म्हणून कार्यरत होते. दरम्याननक्षलवादी विरोधी कारवाया रोखण्यासाठी त्यांचे विशेष योगदान होतं. देशांतर्गत झालेल्या विविध लढाऊ स्पर्धेत शहीद नितीन भालेराव यांनी उत्तम कामगिरी केली होती. शहीद नितीन भालेराव यांच्या पश्चात आई भारतीपत्नी रश्मीमुलगी अन्वीतर दोन भाऊ अमोल व सुयोग असा परिवार आहे.

                     अंत्यसंस्कारस्थळी अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळआमदार सीमा हिरेजिल्हाधिकारी सूरज मांढरेनाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकरकेंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक संजय लाटकरपोलीस आयुक्त दीपक पांडेयछत्तीसगड सेक्टर उपमहानिरीक्षक राज कुमारपुणे सेक्टर उपमहानिरीक्षक बी.के.टोपो,  पोलीस अधिक्षक सचिन पाटीलजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचेसह नागरिक उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM केंद्रीय राखीव पोलीस दलातील असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव अनंतात विलीनडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update