Maharashtra Sports

गुणवंत खेळाडू पेन्शन योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे  या  हेतूने केंद्र शासनामार्फत गुणवंत खेळाडू पेन्शन योजना (SPORTS FUND FOR PENSION TO MERITORIOUS SPORTS PERSON)सुरू करण्यात आली असून राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केले आहे. भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालय गुणवंत खेळाडूंकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्ववत करणे, सक्रीय क्रीडा करियरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही योजना राबवत आहे. या योजनेच्या प्रस्तावासाठी   अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवासी असावा  त्याने ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक प्राप्त केलेले असावे. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त / गुणवंत खेळाडूस खालील नमूद केल्यानुसार मासिक मानधन देण्याची तरतूद केली आहे.

            ऑलिम्पिक / पॅरा ऑलिम्पिक गेम्स प्राविण्यधारक दरमहा २० हजार रुपये मानधन, सुवर्ण पदक विश्वचषक / विश्व अजिंक्यपद स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार) १६ हजार रुपये, रौप्य व कांस्य पदक विश्वचषक स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स) स्पर्धेत समाविष्ट असलेले खेळ प्रकार) १४ हजार रूपये, सुवर्ण पदक – कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स १४ हजार रुपये आणि रौप्य व कांस्य पदक – कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स १२ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. दर चार वर्षांनी आयोजित होणाऱ्या विश्वचषक/विश्व अजिंक्यपद स्पर्धांकरिता योजना लागू राहणार आहे. याबाबत संबधित पात्र खेळाडूंनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचा असून विहित नमुन्यातील अर्जावर संबंधित खेळाच्या राष्ट्रीय खेळ संघटनेचे अध्यक्ष/सचिव यांची स्वाक्षरी किंवा उपसचिव / आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांचे स्वाक्षरीसह प्रस्ताव सादर करावयाचा आहे. याबाबत अधिक माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143