mhada-cash-seized-from-house
Crime

MHADA : महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपेच्या घरातून 88 लाखांची रोकड जप्त

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

पुणे MHADA – म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे याच्या घरातून 88 लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी  पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काहीजणांना अटक होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. सुपेसोबत शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही पोलिसांनी अटक करण्यात आली. म्हाडा पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असून इतर परीक्षांमधील घोटाळे बाहेर येत आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेतही पैसे घेऊन अनेकांना उत्तीर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे.

भुसावळमध्ये भाजपला मोठे खिंडार; 30 नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

MHADA पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, दोन पेपरफुटीचे प्रकरणाचा तपास सुरू होता. म्हाडा MHADA पेपरफुटीचा तपास सुरू असताना टीईटीमध्ये गोंधळ असल्याचे दिसून आले. या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असूनदोघांना अटक केली. यामध्ये सुपे आणि सावरीकरचा समावेश आहे. रात्री सुपेच्या घराची झडती घेतली तेव्हा 88 लाखांची रोकड सापडली. त्याशिवाय सोनेही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

कसा करायचे टीईटीमध्ये घोटाळा

जी. ए. टेक्नॉलॉजीकडे भरती प्रक्रियेची जबाबदारी होती. शिक्षक पात्रता परिषदेत उत्तीर्ण होण्यासाठी पैसे दिलेल्या परीक्षार्थींना ओएमआर शिट रिकामी ठेवण्याची सूचना करण्यात आली होती. पेपर स्कॅनिंग करून तपासणी करण्याच्या वेळी ओएमआर उत्तरपत्रिका भरली जायची आणि उत्तीर्ण केले जायचे. या दरम्यानही काही परीक्षार्थी नापास झाल्यास त्यांना पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज करण्यास सांगितले जायचे आणि त्यात पास केले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक अंदाजानुसार, प्रत्येक परीक्षार्थीकडून 35 हजार ते एक लाख रुपये घेतले जात असत.

आणखीही काही घोटाळे समोर येणार?

म्हाडा पेपरफुटीवरून हा तपास सुरू झाला, त्यातून इतर परीक्षांचे घोटाळे समोर आले त्यामुळे भविष्यात आणखी घोटाळे बाहेर येऊ शकतात आणि अटकही होऊ शकते. ही फक्त सुरुवात असल्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले. पोलीस भरतीबाबत तक्रारी अथवा पुरावे सापडले नसल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com