Maharashtra Economy

ट्विटरचा गंभीर गुन्हा; मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर आणि वाद

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
                     मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर आणि वाद हे ठरलेले समीकरण आहे. केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील वाद तर जगजाहीर आहे. केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी जारी केलेल्या नवीन नियमांवरून ट्विटर आणि केंद्र सरकार आमने सामने आले होते तेंव्हापासून दोघांमधील वाद चांगलाच उफाळून आला आहे.  काही दिवसांपूर्वी ट्विटरने माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर अकाउंट ब्लॉक केले होते तेंव्हाही केंद्र सरकार ट्विटर यांच्यात सामना रंगला होता. ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात शीतयुद्ध चालू असताना ट्विटरने अशी अक्षम्य चूक केली आहे की ज्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. ट्विटरने  भारतीय नाकाशासोबत छेडछाड करत  जम्मू काश्मीर आणि लडाखला भारतापासून वेगळे केले आहे. तसेच या नकाशामध्ये लडाख आणि जम्मू काश्मीर राज्याला स्वतंत्र देश म्हणून दाखवण्यात आले आहे. ट्विटरच्या या कृत्याला सोशल मीडियावर सर्वप्रथम thvaranam नावाच्या युजर्सने ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर ट्विटरने जारी केलेला हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. ही पोस्ट २८  जून २०२१ रोजी सकाळी १०.३८ वाजता शेअर करण्यात आली असून ट्विटर करियर पेजवर भारताचा नकाशा असे लिहिले आहे. केंद्र सरकारला घटनेची माहिती मिळताच त्यांनी याची गंभीर दखल घेऊन ट्विटरला नोटीस बजावली. केंद्र सरकारने  ट्विटरला नोटीस दिल्यावर ट्विटरला उपरती झाली आणि त्यांनी हा नकाशा हटवला. भारताच्या नकाशासोबत छेडछाड करण्याची ट्विटरची ही पहिलीच वेळ नसून याआधी लेहला चीन चा भाग दाखवण्याची करामत ट्विटरने केली आहे. भारतीय नकाशासोबत छेडछाड करणे म्हणजे भारतीय सार्वभौमत्वाशी खेळ करणे होय. भारतीय नकाशासोबत छेडछाड करण्याची चूक ट्विटर  जाणीवपूर्वक करत असल्याचीच शक्यता आहे. कारण ही चूक वारंवार होत आहे. पहिल्यांदा केली ती चूक असते पण वारंवार तीच चूक होऊ लागली तर तिला गुन्हा असे म्हणतात. ट्विटरने हा गुन्हा…. नव्हे गंभीर गुन्हा केला आहे. कोणत्याही देशाच्या नकाशाशी छेडछाड केली तर त्या देशातील जनतेच्या भावना दुखावतात हे माहीत असूनही ट्विटर हा आगाऊपणा करत आहे. ट्विटरच्या हा आगाऊपणा आता केंद्र सरकारने खपवून घेऊ नये. या अक्षम्य चुकीबाबत केंद्र सरकारने ट्विटरवर कायदेशीर कारवाई करावी. भारताच्या नाकाशासोबत छेडछाड करणे कोणाही भारतीय व्यक्तीला कधीच सहन होणार नाही. हे एकप्रकारे देशाच्या सार्वभौमत्वाला दिलेले आव्हान आहे त्यामुळेच या चुकीला माफी न देता केंद्र सरकारने ट्विटरवर कायदेशीर कारवाई करून ट्विटरला त्याची जागा दाखवून द्यावी.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com