midc 2 750x375 1
Food Maharashtra

राज्यातील पूरग्रस्तांना एमआयडीसीकडून भरीव मदत

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे २५ हजार पूरग्रस्त कुटुंबियांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने जीवनावश्यक वस्तुंची मदत रवाना करण्यात आली. यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेतला. महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांतील नागरिकांना एमआयडीसीद्वारे अन्नधान्यांचे वाटप केले जात आहे. यामध्ये राशनचादरीबेडशिटटॉवेलअन्नपदार्थ आदीचा समावेश आहे. याशिवाय पाच ट्रकद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यात येत आहे.

पर्यटनस्थळी पर्यटकांसाठी उपलब्ध होणार तारांकीत दर्जाच्या सोयी-सुविधा

ज्या गावांना एमआय़डीसीद्वारे पाणीपुरवठा केला जात आहेतेथील बिघाड दुरुस्त करण्यात आला असून काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

midc 3

एमआयडीसीच्या राज्यातील ठिकठिकाणच्या कार्यालयातून ही मदत पूरग्रस्त भागांकडे पाठविण्यात आली आहे. ठाणेडोंबिवलीपुणेऔरंगाबादनाशिक आदी प्रादेशिक कार्यालयांकडून ही मदत देण्यात आली. ठाणेडोंबिवली एमआयडीसीकडून 1000 राशनची पाकिटे (25 हजार किलो), 2000 पाण्याच्या बाटल्या, 5500  बँकेट्स, 5500 टॉवेल्स पाठविण्यात आले तर औरंगाबादमधून 500 अन्नधान्याची पाकिटे पाठविण्यात आली. कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रावर पुरामुळे मोठे संकट कोसळले आहे. येथील सुमारे 25 हजार कुटुंबियांना एमआयडीसीच्यावतीने मदत दिली जात आहे. पुढील दोन दिवसांत मदतीचे वाटप केले जाणार आहे. शासन संकटकाळात पूरग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभी असल्याची भावना श्री. देसाई यांनी व्यक्त केली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com