millions-of-items-confiscated
Solapur City Crime

सोलापूरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

गोवा बनावटीचा अवैध मद्यसाठा एकुण 26,20, 320 रू.मुद्देमाल हस्तगत

सोलापूर- महाराष्ट्र (Maharashtra) राज्य आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या आदेशान्वये पुणे विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितिन धार्मिक व उपअधिक्षक आदित्य पवार,यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क ब विभागाचे प्रभारी निरीक्षक अंकुश अवताङे,भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक सुदर्शन संकपाळ,दुय्यम निरीक्षक सुनिल पाटील,सहायक दुय्यम निरीक्षक झगङे,कर्मचारी गजानन होळकर,आण्णा कर्चे,प्रकाश सावंत,चेतन व्हनगुंटी,नंदकुमार वेळापुरे,किशोर लुंगसे,विकास वङमिले,विजय शेळके यांच्या पथकाने दि.१८.१०.२०२१ रोजी सकाळी ७ ते ९;३० सुमारास शेटफळ ते कुर्ङवाङी रस्त्यावर शेटफळ चौकालगत हाॕटेल शिवप्रसाद धाब्यासमोर यशस्वी (Success) कारवाई (Crime) करून एकूण ४ आरोपींना ताब्यात घेतले.

हे वाचा- बनशेट्टी अप्पा प्रतिष्ठान व कलासंगम फौंडेशनच्या वतीने महालक्ष्मी आरास स्पर्धेचे पारितोषिक समारंभ संपन्न.

        या मध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींची विलास मोराळे,कृष्णा मुजमुले,गणेश जाधव आणि मिलिंद मगरेअशी नावे आहेत.त्या आरोपींकङून एक आयशर टॕम्पो ,सिफ्ट कारसह १९०बाॕक्स गोवा बनावटीचा अवैध मद्यसाठा असा एकुणच २६ लाख २० हजार ३२० रू.मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती अधिक्षक नितिन धार्मिक (Religious) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.या आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ च्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास आता प्रभारी निरीक्षक भरारी पथक सुदर्शन संकपाळ हे करत आहेत.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143