download 9
Crime Solapur City

हिसका मारून मोबाइल पळवणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- पायी जाणाऱ्या नागरिकांजवळील मोबाइल हिसका मारून पळून जाणाऱ्या टोळीला विजापूर नाका पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून ६ मोबाइल आणि गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अंबादास उर्फ बबलू शेखर जाधव ( वय २३), दीपक मोहन जाधव (वय २३), मोहित नागेश जाधव (वय २३, रा. सगळेजण सेटलमेंट कॉलनी, सलगरवस्ती परिसर सोलापूर ) या तिघांना अटक करण्यात आली आहे.सकाळी वाॅकिंग करणारे नागरिक, विरळ वस्तीच्या ठिकाणी किंवा दुचाकीवरून जाताना सावज हेरून त्यांचा मोबाइल घेऊन पळून जात होते. विजापूर नाका परिसर, डी-मार्ट, बाळे, एमआयडीसी परिसरामध्ये त्यांनी चोरी उघड झाली  आहे
                      विजापूर नाका व फौजदार चावडी हद्दीतील सहा गुन्हे उघडकीस आले असून सहा मोबाइल जप्त केलेत. गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाकी जप्त आहेत. अंबादास हा चोरलेले मोबाइल विक्रीसाठी विजापूर रोडवरील कुबेर कॉम्प्लेक्सजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. सापळा रचून मंगळवारी कारवाई केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. चावडी हद्दीतील सहा गुन्हे उघडकीस आले असून सहा मोबाइल जप्त केलेत. गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाकी जप्त आहेत. अंबादास हा चोरलेले मोबाइल विक्रीसाठी विजापूर रोडवरील कुबेर कॉम्प्लेक्सजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. सापळा रचून मंगळवारी कारवाई केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PMडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com