fbpx
पाऊस
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- महाराष्ट्रात येत्या 2-3 दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे. मान्सून वेगानं पुढे सरकत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. पुढील पुढील 2-3 दिवसात मान्सून पुढे मध्य अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, महाराष्ट्र व गोव्यातील भागांमध्ये व आणखी काही भागांमध्ये जाण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. भारतीय हवामान विभागाची माहिती शेअर करत के.एस.होसाळीकर यांनी मान्सून कुठे पोहोचला आहे हे सांगितलंय. मान्सून पुढे सरकत असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून अरबी समुद्रातून पुढे सरकत असून लक्षद्वीप, केरळ, किनारपट्टीचा काही भाग, दक्षिण कर्नाटक, उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेशातील काही भाग आण तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागरात मान्सून पुढे सरकला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पुढचे 2, ३ दिवस राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी गडगडासहित पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठाणे, रायगड, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर,सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे.

हे वाचा- सोलापूरातील संचारबंदी काळात जप्त वाहनांची शनिवारपासून होणार मुक्तता; वाहन सोडवण्यासाठी हे आहेत नियम

महाराष्ट्रात सरासरीच्या 101 टक्के पाऊस पडणार
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 3 जूनला केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने यंदाचा मान्सून सरासरीच्या 101 टक्के असेल असा अंदाजानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 101 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातो. भारतीय हवामान विभागनं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनचा पाऊस उत्तर पश्चिम भारतात 92-108 टक्के होण्याती शक्यता आहे. तर, दख्खनच्या पठारावर 93-107 टक्के पाऊस होऊ शकतो. उत्तर पूर्व भारतात 95 टक्के तर मध्य भारतात 106 टक्के पेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग जून महिन्याच्या शेवटी जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज व्यक्त करणार आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update