fbpx
mpda-action-to-be-taken-internally

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

स्थानबद्धतेच्या कारवाईत नागपूर पुणे नंतर सोलापूर पोलीस आयुक्तालय 3ऱ्या क्रमांकावर

सोलापूर MPDA – सोलापूर पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा अंतर्गत एमपीडीए कक्ष असून या कक्षामार्फत सोलापूर शहरांमधील सराईत गुंडांच्या टोळीत अवैध धंदे करणारे टोळी प्रमुख तसेच समाजकंटक प्रमुखांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे व्यक्ती, अवैध वाळू उपसा करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यात बाबतचा अधिनियम 1981 च्या या कायद्यान्वये येरवडा कारागृह पुणे येथे रवानगी करण्यात येते.

चोपडे क्लासेसच्या वतीने नवीन वर्षाच्या निमित्त पालक विद्यार्थीचा स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

             MPDA सन 2021 मध्ये एकूण 14 टोळी प्रमुखांवर माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये पद्धतीची कारवाई केली आहे. यापैकी 9 धोकादायक इसम व 5 हातभट्टीवाले ईसम यांच्याविरुद्ध MPDA अधिनियम 1981 या कायद्यान्वये स्थानबद्ध कारवाई केली आहे. या सराई टोळी प्रमुखांना येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे रवाना करून स्थानबद्धतेची कारवाई पूर्ण केली आहे त्यामुळे त्यांच्या सराईत गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध झालेला आहे. तसेच यामुळे सोलापूर शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत झालेली आहे. माननीय पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या आदेशाप्रमाणे माननीय बापू बांगर पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांचे नियोजन व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे संजय साळुंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र गुरव पोलीस, उपनिरीक्षक विरेंद्र सिंग बायस व विशेषतः एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस नाईक विनायक संगमवार, पोलीस नाईक सुदीप शिंदे, पांडुरंग धानुरे, अक्षय जाधव, विशाल नवले यांनी यशस्वीपणे कारवाई पूर्ण करून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. सदर कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी वेळोवेळी भरघोस बक्षिसे देऊन गौरविले आहे. नागपूर शहर व पुणे शहर यांच्यानंतर तुलनेने लहान असलेले पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांची कामगिरी महाराष्ट्रात तिसर्या क्रमांकावर आहे. सदरच्या कारवाईमुळे सोलापूर शहर पोलिस दलातील प्रतिमा उंचावली असून एम पी डी एस अधिकारी व कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोलापूर शहराच्या शांतता व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कोणतीही गुंडागर्दी खपवून न घेता पोलीस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसाय करणारे सराईत गुंड समाजविघातक कृत्य करणारे यांची यादी तयार करण्यात आली असून सन 2022 मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमपीडीए कायद्यान्वये अशीच कारवाई चालू राहणार आहे. अशी माहिती पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

mpda-action-to-be-taken-internally

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update