fbpx
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

महाराष्ट्र MPSC – राज्यात अवकाळी पावसामुळे (unseasonal rains) अनेक कार्यक्रम स्थगित आणि लांबणीवर गेले आहे. या पावसाचा फटका आता लोकसेवा आयोगाच्या परीक्षांवरही बसला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ठरवलेल्या वेळेतील पोलीस उपनिरीक्षकसाठीच्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतींचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. मुंबईसह संपुर्ण राज्यात अवकाळी पाऊस पडतो आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे गैरसोय झाली आहे. यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला आहे.

हे वाचा – पतीचा खून करून मृतदेह शेतात जाळला; हिंगोली येथील धक्कादायक प्रकार उघडकीस

          महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकामध्ये उपनिरीक्षकसाठीच्या पुणे केंद्रावरील दोन दिवसांच्या आणि कोल्हापूर केंद्रावरील एक दिवसाच्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम पुढे ढकलला असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९(पोलीस उपनिरीक्षक)च्या लेखी परीक्षा ३ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत. सुधारित निकालाच्या आधारे शारीरिक चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांचा प्रथम टप्प्यातील कोल्हापूर, पुणे व नाशिक या केंद्रांवरील शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कार्यक्रम संदर्भित दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे.

          पुणे व कोल्हापूर येथे होत असलेल्या अवकाळी पावसामुळे ( unseasonal rains) पुणे केंद्रावरील दिनांक १ व २ डिसेंबर या कालावधीतील तर कोल्हापूर (MPSC) केंद्रावरील २ डिसेंबरच्या शारीरिक चाचणी आण मुलाखतीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच कोल्हापूर केंद्रावरील दिनांक २ डिसेंबरचा अपिलाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. या कालावधीतील उमेदवारांचा शारीरिक चाचणी व मुलाखतीचा तसेच अपिलाचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) सांगण्यात आले आहे.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update