MSEDCL shock in Jalgaon
Electricity Maharashtra

जळगावात महावितरणचा झटका; जिल्ह्यातील २१ हजार ग्राहकांची वीज खंडित

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

जळगाव-  वीजबीलांची थकबाकी न भरल्याने जळगाव जिल्ह्यातील २० हजार ९१६ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. तर परिमंडळातील जळगाव, धुळे नंदुरबार जिल्ह्यातील अशा एकूण ५६ हजार २६९ वीजग्राहकांचे कनेक्शन बीले न भरल्याने तोडण्यात आले आहे. महावितरणकडून वीज बील वसुलीसाठी कनेक्शन तोडण्याची मोहीम जोमाने राबवण्यात येत आहे. यात घरगुती ग्राहकांसह, औद्योगिक व शेतीपंपाचाही समावेश आहे. दिवाळीनंतर ही मोहिम जोरात राबवण्यात येत असून, याकामी अभियंत्यांनाही उद्दीष्टे देण्यात आली आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

वीज खंडित केलेल्या ग्राहकांची संख्या

जळगाव (२०९१६), धुळे (१६५०८), नंदुरबार (१८८४५).

अशी आहे थकबाकी

{ परिमंडळात १२ लाख ५ हजार ९८ घरगुती ग्राहकांकडे १२८ कोटी ४३ लाख थकबाकी.
{ ८५ हजार ६८५ व्यावसायिक ग्राहकांकडे २२ कोटी.
{ २० हजार २१२ औद्योगिक ग्राहकांकडे ३४ कोटी लाख.
{ ३ लाख ५५ हजार ८७४ कृषी ग्राहकांकडे ४८२९ कोटी ५ लाख.
{ ५ हजार ६०३ पथदिवे ग्राहकांकडे ७३६ कोटी २८ लाख.
{ ४ हजार ४३७ सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहकांकडे ३८९ कोटी ५ लाख.
{ ९ हजार ६५ इतर वर्ग वारीतील ग्राहकांकडे ८ कोटी ४ लाख.
{ ६७२ उच्च दाब ग्राहकांकडे ९४ कोटी ९१ लाख.
{ १६ लाख ८६ हजार ग्राहकांकडे ६ हजार २४१ कोटींची थकबाकी.

पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता

वसुली न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणला वीज खरेदीसाठी पुरवठादारांना रोजच पैसे द्यावे लागतात. प्रचंड वाढलेल्या थकबाकीमुळे आता यापुढे थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना मोहिमा राबवण्याचे निर्देश महावितरणने दिले असून, थकबाकी वसुलीत कसूर करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचे संकेतही दिले आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने ही मोहिम तीव्र केली आहे. याकामी महावितरणने सर्वच यंत्रणा थकबाकी वसुलीसाठी लावली आहे. यासह प्रसंगी पोलिस संरक्षण घेण्यात येणार असल्याचे महावितरणने कळवले आहे. दरम्यान, ही मोहिम यापुढेही सुरू राहणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलांचा त्वरित भरणा करावे असे आवाहन केले.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com