Mumbai local travel is likely to be cheaper
Maharashtra

Mumbai Local travel : आता मुंबई लोकलचा प्रवास स्वस्त होण्याची शक्यता

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

मुंबई Mumbai Local travel – मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. लोकलचा Local प्रवास आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट शुल्कात मोठी कपात केली आहे.त्यामुळे आता कमी पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबई लोकलमधील फर्स्ट क्लासचा प्रवास स्वस्त करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाकडून जानेवारीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. AC लोकलचेही भाडेदर कमी होण्याचे संकेत त्यानुसार मिळत आहेत.

सोलापूर जिल्ह्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 24 हजार 910 घरकुले पूर्ण

दरम्यान, पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक Election of Mumbai Municipal Corporation होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर प्रवाश्यांना दिलासा देण्यासाठी जानेवारी हा निर्णय होईल, असे सांगण्यात येत आहे. AC लोकलचे भाडे कमी झाले तर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच लोकलमधील फर्स्ट क्लास प्रवासही स्वस्त होण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळातील सूत्रांनी दिली आहे.

प्लॅटफॉर्म तिकीट अवघ्या 10 रूपयांत

दरम्यान, मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट Platform ticket शुल्कात मोठी कपात केलीय. 50 रूपयांऐवजी प्लॅटफॉर्म तिकीट 10 रूपयांत मिळेल. कोरोना काळात प्लॅटफॉर्मवरची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाच्या शुल्कात मोठी वाढ झाली होती.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com