murder-handcuff-kanhu-more
Crime Maharashtra

Murder : अखेर पोलिसांच्या ताब्यातून पळालेल्या आरोपी कान्हू माेरेला अहमदनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

अहमदनगर Murder –  राहुरी येथील पत्रकार राेहिदास दातीर यांच्या खून खटल्यातील पोलिसांच्या ताब्यातून पसार झालेला कान्हू गंगाराम मोरे याला पुन्हा अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पाेलिसांना यश आले आहे. राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांची आरोपी कान्हु मोरे व त्याचे साथीदारांनी एप्रिल २०२१ मध्ये अपहरण करून हत्या केली होती. त्याबाबत राहुरी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल हाेता. या गुन्ह्यामध्ये कान्हु मोरे यास अटक करण्यात आली होती.

हे वाचा – अहमदनगर शहरातील एमआयडीसीमधील सनफार्मा कंपनीत भीषण आग; एकाचा जागीच मृत्यू

          Murder न्यायालयीन कोठडीत असताना त्यास काेविड झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू हाेते. त्यानंतर पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात जाण्यास सांगितले. पुणे येथे रुग्णवाहिकेतून घेऊन जाण्याची तयारी केली हाेती. त्याचवेळी बहाणा करून पोलिसांना गुंगारा देत कान्हू माेरे पसार झाला. ही घटना २८ आॅगस्टला घडली. त्याप्रकरणी ताेफखाना पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कान्हू माेरे याचा पसार झाल्यानंतर शाेध सुरूच हाेता. पाेलिस अधीक्षक मनाेज पाटील यांनी स्थानिक गुन्हे Murder शाखेचे पाेलिस निरीक्षक अनिल कटके यांना स्वतंत्र पथक करून माेरे याचा शाेध Murder घेण्याच्या सूचना केल्या.

           सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक सोपान गोरे यांचे पथक शोध घेत असताना कान्हू माेरे याला मध्यप्रदेश येथील बडवा जिल्ह्यात राहत असल्याची माहिती मिळाली. परंतु ताे तेथून पसार झाला. परंतु त्याला मदत करणारे त्याचे नातेवाईक श्रीकांत कचरू मरकड (रा. निवडुंगे, ता. पाथर्डी आणि सतीश श्रीकांत हरिचंद्र (रा. धामोरी खुर्द, ता. राहुरी) या दाेघांनाही ताेफखाना पाेलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. दरम्यान, कान्हू माेरे हा राहुरीतील गुहा फाट्याजवळ एका मंदिरात वेशांतर करून राहत असल्याची माहिती निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानंतर पथकाने तेथील मंदिराला सापळा लावून माेरे याला ताब्यात घेतले. ताेफखाना पाेलिसांकडे माेरे याला वर्ग करण्यात आले आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews