Museum
Environment Fund Maharashtra

Museum : प्राणी संग्रहालय विकासकामांसाठी 10 कोटींचा निधी द्यावा – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

लोकसभा अधिवेशनात केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे केली मागणी

सोलापूर Museum – महात्मा गांधी प्राणी संग्रहालय (Zoo) सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाकडून येणारा निधी अपुरा पडत आहे. निधी अभावी कामे रखडली असल्याने सोयी सुविधा व विकासकामांसाठी (development work) १० कोटी रुपयांचा निधी मिळण्याची मागणी खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी (Jayasiddheshwar Mahaswami) यांनी केली. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी हा प्रश्न उपस्थित केला. सोलापूर शहरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय Museum हे 23.5 एकर मध्ये १९७२ पासून कार्यरत आहे. या ठिकाणी एकूण 138 पक्षी व प्राणी आहेत. त्यापैकी 134 प्राणी व चार पक्षी आहेत प्राण्यांमध्ये बिबट्या, मगर, बोनेट माकड, रेसेस माकड, सांबर, चितळ, काळवीट हे आहेत. सोलापूर प्राणी संग्रहालय हे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण(CZA) दिल्ली अंतर्गत कार्यरत आहे. सन 2009-10 या साली प्राणिसंग्रहालयास 1.78 कोटी निधी CZA कडून प्राप्त झाला होता. 13 व 14 जुलै 2021 रोजी CZA कडून तपासणी करण्यात आली आहे त्यांनी काही गोष्टी नव्याने सुचवले आहेत व काही त्रुटी काढलेले आहेत त्यानुसार प्राण्यांसाठी पशुवैद्यकीय दवाखाना, प्राण्यांसाठी किचन व स्टोअर रूम बांधणे, शवविच्छेदन कक्ष, बर्निंग शेड बांधणे, मगर पिंजरा व फुटपाथची कामे करणे, प्राणीसंग्रालय येथे वॉल कंपाऊंड करणे, चितळ पिंजरा व माकड पिंजरा नव्याने करणे, सांबर साठी नवीन पिंजरा तयार करणे, ब्लॅकबक साठी नाईट शेल्टर हाऊस बांधणे, चैनलिंग व फेंसिंग करणे, बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपण करणे, ऑफिस व रेकॉर्ड रूम इत्यादी कामे करणे Museum. करिता 10 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

हे वाचा – केंद्राने इंधन करातून पावणे चार लाख कोटी वसुल केले; राज्यांना दिले केवळ 20 हजार कोटी

          वार्षिक साधारण खाद्य अन्नासाठी 65 ते 70 लाख खर्च येतो. सध्या प्राणी संग्रहालय (Museum) मध्ये एकूण 18 कर्मचारी कार्यरत आहेत. नियमानुसार प्राणीसंग्रालय मध्ये कमीत कमी 40 कर्मचारी कार्यरत असणे गरजेचे आहे.महात्मा गांधी प्राणी संग्रहालय (Museum) सोलापुरात एकमेव असल्यामुळे व इथून 250 किलोमीटर जवळपास दुसरी कोणतीही प्राणिसंग्रहालय (Museum) नाही त्यामुळेच सोलापूर व आजूबाजूचे जिल्ह्यासाठी एकमेव प्राणीसंग्रालय असून ते असणे खूप गरजेचे आहे. वार्षिक अंदाजे कर्मचारी व देखभाल वरती 1.5 कोटी खर्च होतो. यासाठी केंद्रिय मंत्री भूपेन्द्र यादव यांनी अधिकाधिक निधी देण्याची मागणी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केली आहे.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews