Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
ठाणे – ठाण्यातील मुंब्रा येथील कोविड सेंटरमधील व्हेंटिलेटर व इतर साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे. परंतु हि चोरी दुसरी-तिसरी कोणीही केलेली नसून हि चोरी ठाणे महापालिका आरोग्य अधिकारी मुरुडकर यांनी केली असल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनखाली म्हाडाच्या वतीने कळवा व मुंब्रा येथे कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते.आत ठाण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच मुंब्रा येथील कोविड सेंटरची पहाणी केली असता कोविड सेंटर अस्तावस्त झाल्याचे दिसून आले यामधील असलेले 94 व्हेंटिलेटर व इतर साहित्य काढून नेह्ल्याचे निदर्शनास आले याबाबत येथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता हे व्हेंटिलेटर व इतर साहित्य आरोग्य अधिकारी मुरुडकर घेऊन गेल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे संतप्त झालेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी असे कृत्य करणाऱ्या मुरुडकर यांना निलंबित करा व कोविड सेंटर पूर्ववत करून द्यावे अन्यथा चोरीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143
Post Views:
183