Economy Maharashtra

नजमीन ग्रीनफिल्ड विमानतळासाठी हस्तांतरीत करण्यासंदर्भात प्रस्तावाच्या फेरतपासणी करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. यांना ग्रिनफिल्ड विमानतळासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील मौजे विहिरगाव, मौजे मुर्ती येथील 75.24 हेक्टर वनजमीन हस्तांतरीत करण्यासंदर्भात वन विभागाने सकारात्मक भूमिका घेऊन मुख्यमंत्री यांच्याकडे हा प्रस्ताव फेर तपासणीसाठी पाठवून याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर  करावी, असे निर्देश वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे दिले.

           वने राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत  महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. यांना ग्रिनफिल्ड विमानतळासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील  मौजे विहिरगाव, मौजे  मुर्ती  ता. राजूरा, येथील 75.24 हेक्टर वनजमीन वळती करण्यासंदर्भात  मंत्रालयीन दालनात बैठक झाली. यावेळी विधानसभा सदस्य  सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे  व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर, साप्रविचे विमानचालन सहसचिव म.नू. गावडे, मुख्य वन संरक्षक अरविंद आपटे, आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुनगंटीवार यांनी देशहिताच्या दृष्टीने वन विभागाने सकारात्मक भूमिका  घेऊन मुख्यमंत्री महोदयांकडे हा प्रस्ताव फेर तपासणीसाठी पाठवून याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर करावी अशी मागणी केली.

                   भारतीय वन्यजीव संस्थेने त्यांच्या अहवालात वन्यजीवांच्या दृष्टीने व विविध कॉरिडॉर जोडण्यासाठी असणारे अनन्यसाधारण महत्त्व विचारात घेऊन, विमानतळाच्या बांधकामासाठी हे वनक्षेत्र वळते न करण्याची शिफारस केली. भारतीय वन्यजीव संस्थेने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे की, विमानतळासाठी या जागेशिवाय अन्य जागेचा पर्याय नसेलच तर त्यांनी सुचविलेले mitigation measures लक्षात घ्यावेत. mitigation measures मान्य असल्याचे व तेच ठिकाण प्रकल्पासाठी विचारात घेत असल्याचे प्रकल्प यंत्रणेने कळविले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com