Health

मुंब्रा येथील नालेसफाईचा बोजवारा; नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
ठाणे- सोमवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंब्रा येथील नालेसफाईचा बोजवारा उडाला आहे. विरोधी पक्षनेते अशरफ शानु पठाण यांनी नालेसफाईबाबत प्रश्नचिन्ह उभे केले होते.एकाच ठेकेदाराला दरवर्षी नालेसफाईचा ठेका दिला जातो त्यामुळे नालेसफाई व्यवस्थित होत नाही. ठाण्यात नालेसफाई झाली नसल्याचा दावा त्यांनी केला होता त्याचा हा दावा कुठेतरी खरा होताना दिसत आहे सोमवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंब्रा परिसरातील नाले भरून वाहिले त्यामुळे नाल्यातील कचरा रस्त्यावर आला व नागरिकांच्या घरात गेला.याबाबत विरोधी पक्षनेते अशरफ शानु पठाण यांनी मुंब्रा येथील ही परिस्थिती प्रशासनाला दिसावी यासाठी घटनास्थळावरून ऑनलाईन महासभेत सहभागी होऊन परिस्थिती महासभेसमोर आणली.यावेळी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अध्यक्षा पल्लवी जगताप याठिकाणी उपस्थित होत्या.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com