national-in-the-case-of-sachin-waze
Maharashtra

National : सचिन वाझे प्रकरणात मुळाशी गेले तर फटाके फुटतील; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

औरंगाबाद National –  देशात आणि राज्यात भयानक अस्थिरता आहे. मात्र, त्यावर कोणी बोलत नाही. सचिन वाझे 6 महिने जेलमध्ये होते आणि बडतर्फ होते. नंतर ते शिवसेनेत आले. कार्याध्यक्षांच्या जवळचे होते. मुकेश अंबानी सुद्धा कार्याध्यक्ष जवळचे. हा एक जवळचा माणूस दुसऱ्या जवळच्या माणसाच्या घराबाहेर बॉम्ब लावतो, हेच मला कळत नाही. म्हणून मी यावर जास्त बोलत नाही. मात्र, सचिन वाझे प्रकरणाच्या मुळाशी गेले तर फटाक्यांची माळ फुटेल, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या प्रकरणावर लगावला. राज ठाकरे यांनी औरंगाबाद दौऱ्यावर अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले.

            National मूळ विषय बाजूला ठेवून नको ते विषय पुढे आणला जात आहे. पत्रकारांचाही वापर सुरु आहे. आर्यन खान 28 दिवस आता होता. बाहेर पडल्यावर काहीच नाही. सुशांत सिंग, अंबानी घराबाहेर बॉम्ब, पुढं काय झालं. काहीही नाही. मूळ विषय बाजूला ठेवून दुसरंच सुरु आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला. 5 लाख व्यावसायिकांनी देश सोडला. ही बातमी होती, याचा काय परिणाम होईल, यावर कुणी बोलत नाही. सगळे दुसऱ्याच विषयावर सुरु आहे, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार कधी पडेल?

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रथमच महाविका आघाडी सरकारवर भाष्य केले. हे तीन पक्षांचे सरकार आहे. तीन्ह पक्ष मिळून बनविलेले सरकार आहे. ते पडेल असे वाटत नाही. सत्ता स्थापनेपासून महाविकास आघाडीचे सरकार पडेल, अशी चर्चा आहे. मात्र, मला नाही वाटत ते पडेल असे, असे राज ठाकरे म्हणाले. राज्याच्या दौऱ्यावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, मला थोडं बरं नव्हते. त्यामुळे बाहेर पडता आले नव्हते. गेली दोन वर्ष कुठं जाऊ शकलो नाही, भेटी गाठी नव्हत्या म्हणून बाहेर पडलो. यावेळी ते म्हणाले, पेपरफुटी काही पहिल्यांदा झाली नाही, पेपर फोडणारे अजून सापडले नाही ते वाईट आहे. राज्य सरकार काहीतरी कारण काढून निवडणूक पुढे ढकलत आहे, असं दिसत आहे. ओबीसी सारखे अनेक घोळ घालून ठेवले आहेत, असे ते म्ङणाले.

एमआयएम मोर्चा आरक्षण

आरक्षण शिक्षण आणि नोकरीसाठी असते. सगळं खासगी होत चालले आहे. मग या आरक्षण मागण्या फक्त मतांसाठी आहे. केंद्र आणि राज्य ओबीसी यादीवर बोलत आहेत. केंद्र देत नाही, 435 कोटी त्यासाठी हवेत ओबीसी मोजायला. पण हे पैसे सुद्धा देत नाही, काही तासांच्या भ्रष्टाचारात इतके पैसे निघतात. जातीने बजबजपुरी झालेला इतका महाराष्ट्र मी याआधी कधीही पाहिलेलं नाही. सगळ्यांमध्ये जात आली आहे, इतका खाली हा महाराष्ट्र गेला आहे, अशी चिंता राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com