National Highway
Economy Business Maharashtra

National Highway : छोट्या मोठ्या उद्योगांना आर्थिक फटका बसणार म्हणून ग्रीनफील्ड महामार्गास व्यापाऱ्यांचा विरोध

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

 

अहमदनगर National Highway –   औरंगाबाद – अहमदनगर – पुणे या नव्या सहापदरी राष्ट्रीय ग्रीनफील्ड महामार्गास केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी व राज्य शासनाच्या बांधकाम विभागाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. सध्या अस्तित्वात असलेला मार्ग वळून नव्याने राष्ट्रीय ग्रीनफील्ड महामार्ग तयार केला जाणार आहे. यामुळे औरंगाबाद-पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे नेवासा तालुक्यातील व्यापारी व उद्योजकानी या मार्गाला तीव्र विरोध केला आहे. हा नव्याने होऊ घातलेला राष्ट्रीय ग्रीनफील्ड महामार्ग तातडीने रद्द होऊन जुन्याच महामार्गावर भूसंपादन करावे. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच खा.लोखंडे यांनी संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून या महामार्गावरील छोट्या-मोठ्या उद्योगांना नवसंजीवनी मिळवून द्यावी.

          National Highway  अन्यथा तालुक्यातील महामार्गावरील व्यापारी एकत्रित जमुन या राष्ट्रीय ग्रीनफील्ड महामार्गाविरोधात आंदोलन उभारले असा इशारा दिला आहे.या ग्रीनफिल्ड महामार्गाचे National Highway फायदे कमी व तोटेच अधिक आहेत. हा ग्रीनफिल्ड महामार्ग National Highway झाला तर जुन्या महामार्गावरील अनेकांनी छोटे-मोठे व्यवसाय थाटले आहेत.अनेकांनी आर्थिक उलाढाल करून प्रसंगी कर्ज काढून रस्त्यालगत जमिनी किंमतीत विकत घेतल्या आहेत. अनेक कंपन्या,पेट्रोल पंप,व्यापारी संकुले,लहान-मोठे उद्योग धंदे उभारले आहेत.जर नवीन महामार्ग झाला तर जुना महामार्ग कायमस्वरूपी ओस पडेल. सर्व व्यावसायिक देशोधडीला लागतील,म्हणूनच याच जुन्या महामार्गावर भु-संपादन करून व्यापाऱ्यास नवसंजीवनी द्यावीअशी मागणी केली आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews