new-fair-price-grain-shops
Economy Food Maharashtra Solapur City

खुशखबर ! आता शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करता येणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- राज्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच जुलै व ऑगस्टमध्ये राज्यात झालेली अतिवृष्टी लक्षात घेता आता शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करण्यात  येणार आहेत.

हे वाचाराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी शिफारस पाठविण्याचे आवाहन

                         सद्यस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाने महाराष्ट्र राज्यात गरीब व गरजू लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.शहरी भागातील अशी लोकसंख्या अधिक आहे. तसेच कोरोना या आजाराची तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कालावधीत रास्तभाव दुकानांमार्फत राज्यातील गोरगरीब जनतेला अन्नधान्य तसेच केरोसिन वाटपाचे महत्त्वपूर्ण कार्य चालू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.तसेच राज्यात जुलै व ऑगस्ट पावसामुळे अनेक शहरात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.शहरी भागातील अनेक ठिकाणी नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत तेथे सरकारी मदत अन्नधान्याच्या स्वरूपात रास्त भाव दुकानदारांच्या माध्यमातून देणे अनिवार्य असून शहराची मुळ परिस्थिती पूर्वपदावर आणणे ही शासनाची जबाबदारी ठरते अशी माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143