Technology

नवे माहिती तंत्रज्ञान धोरण अधिक गतिशील असेल – उद्योगमंत्री

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- उद्योग विभागाच्यावतीने नवे माहिती तंत्रज्ञान धोरण आखले जात असून ते पूर्वीच्या धोरणापेक्षा अधिक गतिशील असेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. उद्योग विभागाच्यावतीने माहिती तंत्रज्ञान धोरण आखले जात असून त्याची रुपरेषा ठरविण्यासाठी आयटी क्षेत्रातील जाणकारांसोबत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पनेला अधिक वाव आहे. नव्या आयटी धोरणात याचा समावेश करावा. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, भागांत मोठ्या प्रमाणात आयटी उद्योग विस्तारला आहे. येत्या काळात राज्याच्या ग्रामीण भागांत या क्षेत्राचा विस्तार करण्याचा मानस असून नव्या बदलांसह रोजगार निर्मिती, पर्यावरण संवर्धनांवर अधिक भर दिला जाईल, असे देसाई यांनी सांगितले.

नव्या आयटी धोरणाबाबत नॅस्कॉम, सीआयआय व आयटी क्षेत्रातील आघाडीवरील कंपन्यांमधील २८ हून अधिक जाणकारांनी सूचना केल्या. या सर्व सूचनांचा साकल्याने विचार करून नवे माहिती तंत्रज्ञान धोरण आखण्यात येईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंग, एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अन्बलगन, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com