fbpx
New pavilions open to the trading world
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- युगांडा हा पूर्व आफ्रिकेतला तुलनेने मोठा देश. लोकसंख्या साडेपाच कोटी. इंधन तेलाच्या खाणी आणि नैसर्गिक साधनांची उत्तम देणगी मिळालेला देश. त्यातच या देशाला युरोप आणि अमेरिकेत आपली उत्पादने पाठवण्याची एक आगळीवेगळी संधी मिळाली. या संधी नुसार युगांडातून जी उत्पादने तिकडे निर्यात होतील त्या उत्पादनांवर तिथला आयात कर लावला जात नाही. अन्यथा तो 25 टक्क्यांपर्यंत असू शकतो. म्हणजे युगांडातल्या उत्पादनांना कमी किमतीत आपल्या वस्तू युरोप-अमेरिकेत विकता येतात. जगातल्या सर्वात संपन्न बाजारपेठेत ड्यूटी फ्री माल विकण्याची संधी युगांडाला मिळाली असली तरी एवढा माल तिकडे पाठवावा एवढा औद्योगिक आणि तांत्रिक विकास युगांडामध्ये झालेला नाही. त्यामुळे भारतीय उद्योजकांनी आणि तंत्रज्ञांनी युगांडामध्ये येऊन तिथे उद्योग उभे करावेत त्याचबरोबर स्थानिक लोकांना उद्योग उभे करण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञानही द्यावे अशी मागणी युगांडाच्या नेत्यांनी केली आहे. युगांडाच्या प्रगतीसाठी सोलापुरातील विविध क्षेत्रातील तज्ञ आणि तंत्रज्ञान यांनी युगांडाला जावे असा प्रस्ताव समोर आला. मात्र नेमक्या कोणत्या क्षेत्रातील उद्योजकांनी आणि तंत्रज्ञांनी युगांडाला जावे आणि तिथे नेमके काय करावे याचे तपशील ठरवण्याची गरज होती.
                 सोलापूर सोशल फाउंडेशनने या बाबतीत पुढाकार घेतला आणि हे सारे तपशील निश्चित करण्यासाठी अभ्यास केला. गेल्या शुक्रवारी युगांडाचे शिष्टमंडळ भारतात आले आणि सोलापुरातील उद्योजक, काही संघटनांचे प्रतिनिधी त्याचबरोबर सोलापूर सोशल फाउंडेशन चे प्रतिनिधी यांनी त्यांच्या समोर युगांडासाठी सोलापूरचे नेमके योगदान काय असेल याचे प्रेझेन्टेशन केले. युगांडाच्या प्रतिनिधींनी सोलापूरच्या या सादरीकरणाचे स्वागत केले असून युगांडा मध्ये आल्यास सोलापूरच्या उद्योजकांना आणि तंत्रज्ञांना सर्व प्रकारचे सहकार्य करू असे आश्वासन दिले आहे. या सकारात्मक प्रतिसादातून असे स्पष्ट होत आहे की, युगांडा मध्ये सोलापूरच्या विकासाचे एक नवे दालन उघडले जाणार आहे. त्यातुन सोलापूरची काही उत्पादने युगांडाच्या मार्फत अमेरिकेत आणि युरोपात पाठवली जाणार आहेत. यातून सोलापूरच्या उद्योजकांना जशी संधी मिळणार आहे तशीच सोलापुरातील काही तरुण कुशल कामगारांना आणि तंत्रज्ञानाही नोकरीधंदा उपलब्ध होणार आहे. सोलापूर सोशल फाउंडेशनने युगांडा मध्ये शेती, अन्नप्रक्रिया, वित्तीय सेवा आणि वस्त्रोद्योग या चार क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी उद्योजक, तंत्रज्ञ आणि सल्लागारांची निवड केली आहे.

हे वाचा- मध्य रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्पाचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी कडून उदघाटन

               डाळींब बागांच्या व्यवस्थापनातील तज्ञ अंकुश पडवळे, रेशीम उद्योगातील विशेषज्ञ डॉ. संतोष थिटे, सीताफळ उत्पादनात जागतिक कीर्ती मिळवलेले नवनाथ कसपटे, केळीच्या निर्यातीबाबत आघाडीवर असलेले किरण ढोके, साखर उद्योगातील तरुण उद्योजक अभिजीत पाटील, कांदा आणि भाजीपाल्यात निर्यातीचा व्यापार करणारे सादिक काझी, डाळ मिलचे आणि ऑइल मिल चे मालक रोहन घाला, द्राक्ष बागायतदार आणि संशोधक दत्तात्रय काळे, ग्रामीण विकासातील तज्ञ मोहन अनपट, ज्वारी प्रक्रिया उद्योगातील प्रशिक्षक अनिता शेळके, सेंद्रिय गुळाचे निर्माते हरिभाऊ यादव, शाश्वत शेतीचे प्रयोग करणारे गोरखनाथ भांगे, मसाला उद्योगातील अग्रणी सुमित हब्बु, वस्त्रोद्योगातील विशेषज्ञ परिमल भंडारी आणि चार्टर्ड अकाउंटंट तसेच वित्तीय सल्लागार धीरज बलदोटा. असे हे तज्ञ आणि सल्लागार युगांडाच्या विकासावर सोलापूरची छाप उमटवण्यासाठी सज्ज आहेत. यानिमित्ताने झालेल्या सादरीकरणासाठी सोलापूर सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष आ. सुभाष बापू देशमुख, संचालिका मयुरी वाघमारे- शिवगुंडे, सल्लागार अमित जैन, खासदार डॉ.जय सिद्धेश्वर महास्वामी, असो गारमेंट क्लस्टर फाउंडेशन अध्यक्ष रवींद्र रचा,संचालक बालाजी शालगर व पदाधिकारी तसेच युगांडा दूतावास सचिवा श्रीमती सोफी बिरूगी, खासदार क्यातूहेरवे जॅकलीन, उद्योजक मुकुबी नासर, ल्युम्बजी जेम्स, किझा लुकास, बोसोगा चारलेस, उस्मा नतांबी, नसोगनबी सौल आदी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update