new-series-two-wheelers-launched
Solapur City Economy

सोलापूर जिल्ह्यातील दुचाकी वाहनांसाठी नविन मालिका सुरू

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी नविन मालिका सुरु करण्यात येत आहे.वाहनांची नविन मालिका चालु होण्याच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर  त्याचा ताण पडतो व बऱ्याचवेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो.नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा, यासाठी ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहीत शुल्क तीनपट भरुन हवे असतील त्यांनी  दि. 9 नोव्हेंबर 2021 पर्यंत सोबतच्या वेळापत्रकानुसार कार्यालयाच्या नविन नोंदणी विभागात डीडी  केवळ क्र. 16 अन्वये जारी झालेले डीडी , पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वत: जमा करावा. सदर डीडी फक्त DY RTO SOLAPUR यांच्या नावे नॅशनलाईज/शेड्युल्ड बँकेचा असावा. याव्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील. अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 5अ मध्ये विहीत केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल. उदा. आधार कार्ड, टेलिफोन बिल इत्यादी.

हे वाचाकिळसवाणा प्रकार फ्रुट बियर मध्ये ड्रेनेजचे पाणी;प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट

            एकाच नंबरकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दिनांक 9 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 5.00 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल.या यादीतील अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रकमेचा एकच डीडी जमा करावयाचा असेल त्यांनी सोबतच्या वेळापत्रकानुसार  दर्शविलेल्या दिवशी दि. 10 नोव्हेंबर 2021 रोजी सीलबंद लिफाफयात कार्यालयात जमा करावा. लिलावासाठी सादर केलेला डीडी रुपये 300/- पेक्षा कमी रकमेचा नसावा. सदर डीडी फक्त DY RTO SOLAPUR यांच्या नावे नॅशनलाईज/शेड्यूल्ड बँकेचा असावा. याव्यतिरिक्त इतर नावचे डीडी बाद ठरवले जातील. डीडी कमीत कमी एक महिना मुदतीमध्ये असावा. दि. 10 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 5.00 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर मुख्यालय यांच्या उपस्थितीत पात्र सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल. एकदा राखून ठेवलेल्या नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करुन वाहन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्य होईल व फी सरकारजमा होईल, कोणतीही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिसिथतीत परता करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही. नविन दुचाकी मालिकेचे वेळापत्रक MH13DV  8 नोव्हेबंर 2021 ते 9 नोव्हेंबर 2021 तिप्प्ट शुल्कचे अर्ज व दुचाकी वाहनांसाठी नियमित अर्ज स्विकारणे. वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 4.00. 9 नोव्हेबंर 2021 सायंकाळी 5.00 वाजता यादी जाहीर. 10 नोव्हेंबर 2021 दुपारी 3 वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात लिलावासाठीचे डीडी स्वीकारणे रुपये 300/- पेक्षा जास्त रकमेचे डीडी जमा करणे गरजेचे 10 नोव्हेंबर 2021 तिप्पट शुल्काच्या अर्जासाठी व दुचाकी वाहनांसाठी आलेल्या एकापेक्ष अधिक अर्जांचा लिलाव सायंकाळी 5.00 वाजता

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews