Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
अकोला- शहरातील जुने शहरातील गाडगे नगर मध्ये राहणारा कुख्यात गुंड धनराज उर्फ कालु संजय कुचर (वय २५ वर्ष) याला एक वर्षासाठी एम पी डी एफ कारवाई अंतर्गत कारागृहात स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. या गुन्हेगारावर गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, बेकायदेशिरित्या शस्त्र बाळगणे, तडीपारी आदेशाचे उलंघन करणेअसे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापुर्वी विवीध कलमान्चये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात घेऊन ही कारवाई करण्यात आली.
कुख्यात गुंड धनराज उर्फ कालु संजय कुचर, याच्या गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता पोलिस अधीक्षक यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी यांना सादर केला होता. जिल्हादंडाधिकारी, जितेंद्र पापळकर यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वत:चे स्त्रोताद्वारेे माहिती मिळवुन हा कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याबाबतचा आदेश शुक्रवारी पारीत केला. जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशावरून धनराज उर्फ कालु संजय कुचर याचा तत्काळ शोध घेवून त्यास जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ, जुने शहर येथील पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख, अनिल खडेकार यांनी पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143