Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
एनटीपीसी प्रकल्पात आयोजित बैठकीत वैद्यकीय साहित्याची मागणी
सोलापूर- सोलापूर जिल्ह्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तालुक्यासह ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा शिरकाव अधिक होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. त्यासाठी रुग्णांवर योग्य व वेळेत वैद्यकीय साहित्यांची आवश्यकता आहे. त्याची पूर्तता होण्यासाठी राष्ट्रीय औष्णिक विद्युत प्रकल्प (एनटीपीसी ) ने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून भरीव मदत करीत रुग्णसेवा करावी यासाठी खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी एनटीपीसीला बैठक आयोजित केली.
सोमवारी राष्ट्रीय औष्णिक विद्युत प्रकल्प (एनटीपीसी ) येथे खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा करून काही निर्णय घेण्यात आले. खा. डॉ. महास्वामी यांनी प्रथमतः एनटीपीसी प्रकल्पातील कोरोना परिस्थितीची माहिती घेतली. येथे केलेल्या कोव्होड केअर सेंटर, कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेत मार्गदर्शन केले. याप्रसंगी एनटीपीसी चे महाप्रबंधक एस. राव, जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले उपस्थित होते.
हे वाचा- कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घटकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करा
https://solapurcitynews.com/market-committee-against-corona/
सध्या वैद्यकीय साहित्यांची गरज भासत आहे. त्यामुळे 20 व्हेंटिलेटर, 100 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 5 रुग्णवाहिका, 2 ऑक्सिजन प्रकल्पांची मागणी केली आहे. या वैद्यकीय साहित्यांअभावी कोरोनाग्रस्त रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. यामुळे हे साहित्य लवकरात लवकर उपलब्ध झाल्यास कोरोना रुग्णांची मोठी सेवा होईल, असे खा.डॉ. महास्वामी यांनी सांगितले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत महाप्रबंधक एस. राव यांनी एनटीपीसीकडून अधिकाधिक सहाय्य करण्यासाठी समर्थता दर्शविली.
#solapurcitynews