Nutrition fair held at Shirwal
Solapur City

सी ई ओ दिलीप स्वामी यांच्या हस्ते सेविकांचे सत्कार; शिरवळ येथे पोषण जत्रा कार्यक्रम संपन्न

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

अक्कलकोट (प्रवीणकुमार बाबर) – पोषण माह पोषण जत्रा आयोजित कार्यक्रम मौजे शिरवळ येथील हनुमान मंदिरात पार पडला या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर दिलीप स्वामी उपस्थित होते. पोषण माह कार्यक्रम संपन्न झाला असून, दरम्यान या कार्यक्रमात जास्तीत जास्त डॅशबोर्ड वरती एन्ट्री व कामकाज करणाऱ्या अंगणवाडी सेविका नसीमा शेख सांगवी बु, रेखा खोबरे शिरवळ, सुरेखा आळीमोरे किणी, या सेविकांचा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्या सत्कार करण्यात आला.

हे वाचा- सोलापूरातून रेल्वे सेवा पूर्ववत करा: आ. सुभाष देशमुख यांची मागणी

         दरम्यान, शिरवळ येथील आयोजित कार्यक्रमात स्मार्ट अंगणवाडी चे उद्घाटन करण्यात आले असून, आणि या पोषण माह जत्रा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, किशोर वयीन मुलींचे बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयावर अनेक मनोगत यावेळी सादर करण्यात आले, धान्यांची रांगोळी काढून आहार प्रदर्शन करण्यात आले. तसेच गरोदर स्तनदा माता यांच्यामध्ये प्रश्न मंजुषा असे अनेक विविध कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, सरपंच बसवराज तानवडे, बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लदवाड, विस्तार अधिकारी मृणालिनी शिंदे, पर्यवेिक्षका शुभदा जेऊरकर, टिपीओ एस घुगरे, महंमद मुल्ला, सूरज सोनके, वसंत पाटील, सोमनाथ जकीकुरे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143