Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
आम्ही राज्यपालांकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजपा, जनता दल युनायटेड, हिंदुस्तानी अवामी मोर्चा, विकसशील इन्सान पार्टी या पक्षातील नवनियुक्त आमदारांची यादी सोपविली असून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. राज्यपालांनी आमचे पत्र स्वीकारले आहे. त्यांनी सत्ता स्थापनेसाठी आम्हाला आमंत्रण दिले आहे, असे नितीश कुमार यांनी सांगितले. मात्र, उपमुख्यमंत्री पदासाठी कोण उमेदवार असेल याबाबत त्यांनी मौन बाळगले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजप नेते सुशील कुमार मोदी राज्यपाल चौहान यांच्या भेटीसाठी गेले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आज (रविवार) नितीश कुमार यांची विधिमंडळाच्या नेतेपदी निवड केली. एनडीएच्या विधिमंडळाची बैठक रविवारी बोलावण्यात आली होती, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. एनडीएमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांची निवड होते की, नाही याबाबत अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र, निवडणुकीपूर्वीच ठरल्याप्रमाणे नितीश कुमार यांचीच मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात येईल, असे भाजपाने स्पष्ट केले होते.
दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला-
रविवारी झालेल्या नाट्यमय घडामोडीत केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचे ट्विट समोर आले होते. गिरीराज यांनी बिहारचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांना टॅग करत लिहिले की, ‘तुम्ही नेते आहात, तुमच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होते. भविष्यात तुम्ही भाजपचे नेते राहाल, पदामुळे कोणीही लहान-मोठे होत नाही’, गिरीराज यांच्या या ट्विटनंतर, सुशील मोदींच्या जागी दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला अवलंबता येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143