Maharashtra Solapur City

क्रांती दिनानिमित्त ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील व गटनेते आनंद चंदनशिवे यांनी केले अभिवादन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

हुतात्मा स्तंभ बलिदान चौक परिसर सुशोभीकरण न झाल्यास करणार आंदोलन गटनेते आनंद चंदनशिवे

सोलापूर- नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने बलिदान चौक येथील हुतात्मा स्तंभ येथे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील गटनेते आनंद चंदनशिवे नगरसेवक गणेश पुजारी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलताना गटनेते आनंद चंदनशिवे म्हणाले की सोलापूर शहर हुतात्म्यांचे शहर असून देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सोलापूर शहराला चार दिवस अगोदर स्वातंत्र्य मिळाले होते स्वातंत्र्याची क्रांती ज्योत सोलापूर शहरातून सुरू झाली त्यानिमित्ताने अभिनंदन व्यक्त करून येथील क्रांतिस्तंभ परिसर पाहणी केली व यावेळी सदरचा परिसर हा सुशोभिकरण व दुरुस्ती करण्याची मागणी ज्येष्ठ नगरसेवक श्री सुरेश पाटील यांनी केली आहे या मागणीस पाठिंबा दर्शविला.

हे वाचा- मंगळवारी मिळणार हे डोस; जवळील केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्या
             सदर मागणी ही योग्य असुन हुतात्मा स्तंभ बलिदान चौक परिसर सुशोभिकरण कामास लवकरात लवकर सुरुवात करावी अन्यथा सोलापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर सर्वपक्षीय नगरसेवकांसह मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी दिला. या अभिवादन प्रसंगी नगरसेवक सुरेश पाटील, आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी होणकोंबडे बुवा, बाळासाहेब आळसंदे उमेश राठोड सतीश अड्डाकुल व अन्य उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com