Maharashtra Solapur City

महिला दिनानिमित्त मुलींसाठी सायकल बँक योजनेचा शुभारंभ

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर – पद्मशाली शिक्षण संस्था संचलित , सौ भू म पुल्ली कन्या प्रशाला व रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींसाठी सायकल बँक योजनेचा शुभारंभ करण्यात आला . रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे प्रेसिडेंट सुहास लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त पांडुरंग दिड्डी , विजयकुमार गुल्लापल्ली , रोटरीचे सेक्रेटरी विशाल वर्मा , गोवर्धन चाटला , मासाई चाटला , जयेश पटेल , सुनील माहेश्वरी, कालिदास जाजू , सुरज तापडिया, शिवाजी उपरे, श्वेता झंवर , देणगीदार प्रशांत सिंगी , गोविंद भट्टड , राहुल जाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. मुख्याध्यापिका गीता सादुल यांनी प्रास्ताविकातून सायकल बँक योजनेची माहिती देताना पूर्व भागात सौ भू म पुल्ली कन्या प्रशाला ही एकमेव मुलींची शाळा असून शाळेपासून 13 ते 15 किमी अंतरावरून शिक्षणासाठी मुली रिक्षा व बसने शाळेत येतात . कोरोनाच्या जागतिक संकटामुळे सध्या महापालिकेचे बस उपलब्ध नाहीत शिवाय रोजचा रिक्षा खर्च पालकांना परवडण्यासारखं नाही. आर्थिक अडचणीमुळे मुली शाळेत न येता शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने सायकल बँक योजना राबवित असल्याचे सांगितले. रोटरी क्लब ऑफ सोलापूरने या योजनेसाठी पुढाकार घेऊन समाजातील दानशूर व्यक्तींना मुलींसाठी नवीन अथवा जुन्या सायकली देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन केले. देणगी स्वरूपात मिळालेल्या या सायकलीची नोंद करून गरजू मुलींना वर्षभरासाठी मोफत वापरण्यासाठी देण्यात येतील . या योजनेमुळे मुलींना नियमितपणे शाळेत येता येईल शिवाय सायकलिंग केल्याने मुलींचं आरोग्य चांगले राहील आणि प्रदूषणाला देखील आळा बसेल . प्रातिनिधीक स्वरूपात पाच सायकली देण्यात आले . देणगीदार गोवर्धन चाटला यांनी देशाच्या उन्नतीसाठी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे . मुली आणि महिला आत्मनिर्भर झाल्या तर देशाच्या विकासाचा दर वाढेल . मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने महिला दिनाचे औचित्य साधून या योजनेचा शुभारंभ करत असल्याचे प्रतिपादन केले . अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्रसंगी प्रेसिडेंट सुहास लाहोटी यांनी *मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून रोटरीच्या सर्व सदस्यांनी आणि दानशूर व्यक्तींनी या योजनेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपले योगदान द्यावे असे आवाहन केले  . भविष्यात जास्तीत जास्त मुलींना या सायकल बँक योजनेअंतर्गत सायकली देण्यासाठी प्रयत्न करण्याची हमी देत रोटरीच्या विविध उपक्रमाची त्यांनी यावेळी माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी उपमुख्याध्यापक युवराज मेटे व शिक्षकांनी परिश्रम घेतले. परमेश्वर बाबळसुरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांनी आभार मानले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143