Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत जनहित
सोलापूर – जागतिक शौचालय दिनानिमित्त 19 नोव्हेंबर 2022 रोजी स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावात हागणदारीमुक्त सातत्य ठेवण्यासाठी, वैयक्तिक शौचालयाचा वापर, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची विहित कालमर्यादेत कार्यवाही करण्यासाठी 3 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
जिल्ह्यातील स्वच्छतेच्या कामास गती देऊन स्वच्छतेचा जागर करावयाचा असून जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत गावस्तरावर स्वच्छतेच्या विविध उद्दिष्ठांच्या पूर्तीसाठी सूक्ष्म नियोजन करुन कामे पूर्ण केली जाणार आहेत. या मोहीम कालावधीत यापूर्वी मंजूर केलेले वैयक्तिक, सार्वजनिक शौचालय संकुलाचे बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, गोबरधन प्रकल्प, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प, शोषखड्डे बांधकाम, नादुरुस्त शौचालय दुरूस्ती करणे, मैला गाळ व्यवस्थापन अशाप्रकारे सुरू असणारी ही सर्व कामे पूर्ण केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या विशेष स्वच्छता मोहीम कालावधीत ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घेऊन सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, एक शोषखड्डे असलेली शौचालय दोन शोषखड्डे शौचालयात रुपांतर केली जाणार आहेत. याबाबत जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी नियोजनपूर्वक कामे करुन ही मोहीम अतिशय प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं./ पाणी व स्वच्छ्ता ) इशाधीन शेळकंदे यांनी केली आहे.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143